esakal | Belgaum Election Result 2021 - उद्या पोलिस बंदोबस्तासह जमावबंदी लागू
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum Election Result 2021 - उद्या पोलिस बंदोबस्तासह जमावबंदी लागू

बंदोबस्तासाठी दोन पोलिस उपायुक्तसह ३०० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Belgaum Election Result 2021 - उद्या पोलिस बंदोबस्तासह जमावबंदी लागू

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सोमवार (६) बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये होणार आहे. मतमोजणी शांततेत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी परिसरात १४४ कलम लागू करण्यात आला आहे. तसेच बंदोबस्तासाठी दोन पोलिस उपायुक्तसह ३०० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेच्या ५८ प्रभागासाठी शुक्रवार (३) रोजी मतदान पार पडले आहे. मतदान पेट्या येथील बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी २४ तास पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्रावर केवळ उमेदवार आणि त्यांच्या एजंटाना प्रवेश देण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे पालन करत मतमोजणी प्रक्रिया आटोपली जाणार आहे.

हेही वाचा: 'सरकारला लॉकडाऊन बरा वाटतोय', राज ठाकरेंची टीका

निवडून आलेला उमेदवाराकडून आनंदोत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. अन्यथा संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सर्व निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या काळात कोणत्या प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे अशी सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून करण्यात आली आहे. तसेच पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी बी.के. मोडेल हायस्कूल या मतमोजणी केंद्राला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे. खडेबाजारचे सहाय्यक पोलीस आयुक्त ए. चंद्रप्पा, यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांचे सहकारी बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत.

"मतमोजणी शांततेत पार पडावी, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्याठिकाणी तीनशे पोलिसांचा फौजफाटा असणार आहे. मतमोजणी परिसरात १४४ कलम लागू करण्यात आला आहे."

- डॉ. के. त्यागराजन, पोलीस आयुक्त.

हेही वाचा: Paralympic Medal Tally : 5 गोल्डसह इंडिया 24 व्या स्थानावर; चीन 200+

loading image
go to top