बेळगांव : बेडकिहाळ-भोज रस्त्यावर 10 एकरातील ऊसाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगांव : बेडकिहाळ-भोज रस्त्यावर 10 एकरातील ऊसाला आग

बेळगांव : बेडकिहाळ-भोज रस्त्यावर 10 एकरातील ऊसाला आग

बेडकिहाळ (बेळगांव) ः बेडकिहाळ-भोज रस्त्याच्या दक्षिण भागातील भोज सर्व्हे नंबरमधील सहा शेतकऱ्यांच्या १० एकरातील उसाच्या फडाला गुरुवारी (ता. 11) दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता वेगाने आग पसरून नजीकच असलेल्या उसाच्या फडांना घेरले. त्यात शेतकऱयांना लाखो रूपयांचा फटका बसला.

याबाबत अधिक माहिती अशी, भोज येथील शेतकरी सचिन कमते यांचा दोन एकर, सुभाष सदलगे यांचा अडीच एकर ऊस व ड्रीप साहित्य, अजित सदलगे यांचा एक एकर, प्रदीप सदलगे यांचा एक एकर, सतीश कुलकर्णी यांचा दीड एकर, अरुणकुमार कुंभार यांचा दोन एकर ऊस व ड्रीप साहित्य जळून खाक झाले. त्यात भोज येथील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. दुपारी अचानक उसाच्या फडांना आग लागल्याने परिसरातील शेतकरी एकत्र आले. त्यांनी आग पसरू नये, यासाठी ऊस तोडल्याने भडका आटोक्यात आला. आग विझविण्यासाठी सदलगा येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. या शेतकरयांचा ऊस हुपरीतील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखाना व टाकळीवाडीच्या गुरुदत्त साखर करखान्याकडे नोंद होता.

हेही वाचा: "EDने वक्फ बोर्डाच्या 30 हजार संस्थांची चौकशी करावी"

सचिन कमते यांच्या उसाची तोड चालू होती. पण या फडापासून आग लागलेला फड थोड्या अंतरावर होता. आग पसरून तोडलेल्या उसाच्या मोळ्या व उर्वरित फडही जळाला. आगीचे कारण समजू शकले नाही. शेतकऱयांचे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

loading image
go to top