belgaum : शहापुरात अज्ञात समाजकंटकांडून वाहनांची तोडफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum : शहापुरात अज्ञात समाजकंटकांडून वाहनांची तोडफोड

Belgaum : शहापुरात अज्ञात समाजकंटकांडून वाहनांची तोडफोड

बेळगाव : शहापूर परिसरात घरासमोरील रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या चार मोटारींची अज्ञात समाजकंटकानी तोडफोड केली आहे. शुक्रवार (ता. १२) रात्री ११ ते १ च्यादरम्यान या घटना घडल्या असून अज्ञातांनी पेवर आणि दगडाने मोटारींच्या काचा फोडल्या आहेत. या सर्व घटनांची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली असून घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: हस्ताक्षरावरून पटली ओळख? गडचिरोलीच्या चकमकीत 'ते' चौघे ठार?

गेला चार दिवसापासून पोलीस खाते हलगा मछे बायपास रस्त्याच्या बंदोबस्तात व्यस्त आहेत. त्यातच काल रात्री काही अज्ञातानी केलेल्या आगळीमुळे पोलीस खात्याची डोकेदुखी वाढली आहे. कचरे गल्ली येथील घरासमोरील रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या तीन मोटारींच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तर सराफ गल्ली येथे रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या एका मोटारीची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोडीचा आवाज येतात घरातून बाहेर आलेल्या नागरिकांनी ही माहिती तातडीने शहापूर पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोडफोड करणारे तोपर्यंत पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

हेही वाचा: नक्षलवादाला शहरी चेहरा देण्याचा मिलिंद तेलतुंबडेचा प्रयत्न

अज्ञातानी मोटारींच्या काचा फोडल्या असल्या तरी कारमधील कोणत्याही वस्तूची चोरी केलेली नाही. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने ही तोडफोड करण्यात आली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. असा प्रकार करणारा मानसिक रुग्ण असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मोटारींची तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले आहे. एकंदरीत एकाच रात्री चार मोटारी फोडण्यात आल्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच संबंधितांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

"कचेरी गल्ली आणि सराफ गल्ली या ठिकाणी रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या मोटारींच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. मात्र कार मधील कोणत्याही वस्तूची चोरी झालेली नाही. केवळ रस्त्यावरील वाहनांना संशोधने लक्ष्य केले आहे. कंपाउंड मध्ये पार्क करण्यात आलेल्या एकाही मोटारीला धक्का बसलेला नाही. घटनेची नोंद करून घेऊन तपास हाती घेतला आहे. आज पासून परिसरात रात्रीची गस्त वाढविण्यात येणार आहे."

- मंजुनाथ नाईक, पोलीस उपनिरीक्षक शहापूर पोलीस ठाणे

loading image
go to top