बेळगाव : सदाशिवनगरात गॅसवाहिनीला गळती

नागरिक धास्तावले; ‘मेगा गॅस’ तातडीने उपाययोजना
 गॅसवाहिनीला गळती
गॅसवाहिनीला गळतीsakal

बेळगाव : घरोघरी गॅसजोडणी देण्यासाठी घालण्यात आलेल्या वाहिनीतून गॅस गळती झाल्याची घटना आज घडली. सदाशिवनगर परिसरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळच हा प्रकार घडला. मात्र, गळतीचे प्रमाण खूपच कमी होते.

ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, त्या ठिकाणी रस्ता खचलेला असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्या पाण्यातून गॅस बाहेर येऊ लागल्याचा प्रकार पाहिल्यानंतर तेथील नागरीक धास्तावले. त्याबाबतची माहिती तातडीने मेगा गॅस कंपनीला देण्यात आली. कंपनीकडून तातडीने उपाययोजना करण्यात आली. गॅस पुरवठ्यासाठी शहरात कंपनीने वाहिनी घातली आहे. विशेषतः उपनगरांमध्ये वाहिनी घालण्यात आली आहे. तेथील घरांमध्ये गॅसजोडणीही देण्यात आली आहे, पण गेल्या दोन वर्षात या वाहिनीचे नुकसान होऊन त्यातून गॅस गळती झाल्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. बेळगाव शहरात भूमिगत वीजवाहिनी घालण्याचे तसेच गॅसवाहिनीचे काम एकाचवेळी सुरु झाले. त्यानंतर शहरातील स्मार्ट सिटी व अन्य कामे सुरू झाली.

स्मार्ट सिटी योजनेचे काम करताना गॅसवाहिनीचे अनेक ठिकाणी नुकसान झाले. त्यामुळे मेगा गॅस कंपनीला नुकसानही सहन करावे लागले आहे. त्यानंतर गॅस कंपनी व स्मार्ट सिटी योजनेचे अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेत शहरात कोणत्या भागात गॅसवाहिनी घालण्यात आली आहे, याची माहिती देण्यात आली. त्यानंतर स्मार्ट सिटीच्या कामामुळे वाहिनीला गळती लागण्याचे प्रकार कमी झाले होते, पण शनिवारच्या गळतीच्या घटनेमुळे पुन्हा गॅसवाहिनी चर्चेत

आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com