बेळगाव : शहराला फुकट्या जाहिराती फलकांचा विळखा

महापालिका, कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष ; महसुलावर परिणाम
बेळगाव : शहराला फुकट्या जाहिराती फलकांचा विळखा
बेळगाव : शहराला फुकट्या जाहिराती फलकांचा विळखाsakal

बेळगाव ः बेळगाव शहराच्या सौंदर्यात बाधा ठरत असलेल्या फुकट्या जाहिराती फलकामुळे मोठ्या प्रमाणात शहराचे विद्रुपीकरण होत आहे. महापालिका व कॅण्टोन्मेंट हद्दीत असे फलक दिसून येत आहेत. याकडे महपालिका व कॅण्टोन्मेंट बोर्डाने लक्ष देवून फुकट्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

शहरातील कोल्हापूर सर्कल, चन्नमा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, गोगटे सर्कल, गोवावेस, आरपीडी परिसर, रेल्वे स्थानक परिसर, बस स्थानक परिसर आदी भागात बस थांबा, सार्वजनिक उद्याने, विद्युत खांब, झाडे, हायमास्ट दिवे यावर सर्रासपणे जाहीराती लावल्या जातात. शहरात महापालिका व कॅण्टोन्मेंट हद्दीत हे फलक लावले आहेत. फलक लावण्यासाठी संबंधीत म्हणजेच कॅण्टोन्मेंट किंवा महापालिकेकडून रितसर परवानगी घेणे आवश्‍यक आहे. काही जण परवानगी घेतात. मात्र, अनेक वेळा परवानगी न घेता फलक लावले जातात. यामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा तसेच निवडणुकीतील फलकांचा अधिक समावेश आहे.

बेळगाव : शहराला फुकट्या जाहिराती फलकांचा विळखा
ST महामंडळाकडून कारवाईला सुरूवात; 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन!

सध्या फुकट्या जाहीरातींचे ग्रहण शहराला लागले आहे. ते रोखण्यासाठी प्रशासनाकडे पुरेशी यंत्रणा व त्यावर कठोर कारवाई करण्यासाठी ते कमी पडत आहेत. शहरातील चौकांमध्ये अशा प्रकारच्या जाहीराती आढळून येतात. अशाप्रकारे अवैद्य आणि विनापरवाना जाहीरातींवर महापालिका व कॅण्टोन्मेंट बोर्डाने कडक कारवाई करावी. अशी मागणी होत आहे. बेळगाव शहर सध्या स्मार्ट होत आहे. मात्र, या जाहीरातीच्या फलकांमुळे हे सौंदर्य हरवत चालले आहे. महापालिका व कॅण्टोन्मेंट बोर्डाला या जाहीरात फलकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन मिळते. मात्र, अनेक ठिकाणी फुकट्या जाहीराती असल्याने याचा फटका महापालिका व कॅण्टोन्मेंट बोर्डालाच बसत आहे.

महापालिका, कॅण्टोन्मेंट बोर्डाने दंड आकारून अशा जाहीरातीवर बंधने आणावीत. अशी मागणीही होत आहे. मात्र, ढिसाळ कारभारामुळे आणि नियोजनाअभावी फुकट्या जाहिरातदारांना अभय मिळत आहे. काही जाहिरातदारांनी फलक काढता येऊ नये याची खबरदारी घेतली आहे. बऱ्याच वेळा महापालिकेच्या खुल्या जागेवर व इमारतींवर अशा फुकट्या जाहीराती दिसून येतात. मात्र, त्यावर कारवाई होताना दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com