बेळगावच्या लेकीची लेफ्टनंट कर्नलपदाला गवसणी

पंकजा कुगजी; बेळगावच्या पहिल्या महिला, १७ वर्षापासून सेवेत
बेळगावच्या लेकीची लेफ्टनंट कर्नलपदाला गवसणी
Updated on

बेळगाव : लष्करात अलीकडे मुलींसाठी दरवाजे खुली झालेली असताना बेळगावच्या कन्येने लष्करात लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत झेप घेऊन यशाला गवसणी घातली आहे. येळ्ळूरच्या लेकीची पंकजा कुगजी यांनी ही किमया करून दाखवली असून या उच्च पदावर पोचलेल्या त्या बेळगावच्या पहिल्या महिला (Women) ठरल्या आहेत.

देश सेवेबाबत बालपणापासून वडील निवृत्त सुभेदार अनंत परशुराम कुगजी यांच्याकडून बाळकडू घेतलेल्या पंकजा यांना लष्करी सेवा आणि लष्करातील अधिकार पद खुणावत होते. सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून सेवा बजाविण्याचे स्वप्न उराशी बाळगून शालेय व महाविद्यालय दशेत त्यांनी तयारी सुरू केली. २००३-०४ मध्ये बेळगावमध्ये पदवी शिक्षण घेत असताना आर्मी ऑफिसर पदाच्या भरतीबाबत अर्ज मागविले. खडतर वाटणारे आव्हान यशस्वीपणे पार करून अखेर त्या लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्यांच्या या सेवेला आता १७ वर्षे झाली असून लेफ्टनंट कर्नल म्हणून सध्या सेवा बजावीत आहेत. लष्करी अधिकारी ते लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत त्यांनी संपादित केलेले यश आश्वासक आणि प्रेरणादायी ठरले आहे.

बेळगावच्या लेकीची लेफ्टनंट कर्नलपदाला गवसणी
देश सोडून पळालेल्या परमवीर सिंग यांच्यावर यंत्रणांनी विश्वास का ठेवावा?

लष्करातील इंजिनियरिंग विभागात संरक्षण यंत्रणेच्या अंतर्गत आहे. लष्करात या श्रेणीचे पद मिळवणाऱ्या खूप कमी महिला अधिकारी असून यात आता पंकजा यांनी आपली छटा उमटवली आहे. पंकजा यांचे पती अमोल माळी मेजर होते. ५ वर्षे सेवा बजावून निवृत्त झाले. सध्या ते एका खासगी कंपनीत बजावीत आहेत. प्रियंका यांचे वडीलही निवृत्त जवान आहेत. यामुळे पंकजा यांचे प्राथमिक ते १२ वी पर्यंतचे शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी मराठा मंडळ इंजिनियर महाविद्यालयातून इंजिनिअरिंग पूर्ण केली. त्यानंतर आर्मीमध्ये ओटीए (ऑफिसर ट्रेनिंग अकादमी-चेन्नई) येथे २००४ प्रशिक्षण घेतले. अरुणाचल प्रदेश येथे पहिल्यांदा पोस्टींग होऊन सेवा बजाविण्यास सुरु केली व आता त्यांच्या सेवेला १७ वर्ष पूर्ण झाली आहेत.

बेळगावच्या लेकीची लेफ्टनंट कर्नलपदाला गवसणी
वैद्यकीय शिक्षण विभागाचे पहिले आयुक्त म्हणून वीरेंद्र सिंह यांची नियुक्ती

पंकजा कुगजी यांच्याबद्दल थोडक्यात

- पहिले ते बारावीपर्यंत शिक्षण केंद्रीय विद्यालय

- मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशनपर्यंत शिक्षण

- शालेय दशेत एनसीसी

- पहिल्यांदा अरुणाचल प्रदेश येथे पोस्टिंग

- एकूण १७ वर्षे सेवा

- इस्टर्न सेकटर येथे सध्या लेफ्टनंट कर्नल

"लष्करात सेवा बजाविणे आव्हानात्मक असले तरी महिलांच्या कर्तृत्वला संधी आहे. यामुळे मुलींनी आवड व करिअर म्हणून या क्षेत्राकडे पाहू शकतात. शिवाय अलीकडे मुलींना एनडीएचे दरवाजे खुली झाली आहेत. त्याद्वारेही लष्करात रूजू होऊन देशसेवेसाठी योगदान द्यावे."

- पंकजा कुगजी, लेफ्टनंट कर्नल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Wildlife rescuer trapped by rat snake
Marathi News Esakal
www.esakal.com