बेळगाव: पाटबंधारे खात्यातील अधिकारी निलंबित; बँक खाती गोठविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suspended

बेळगाव: पाटबंधारे खात्यातील अधिकारी निलंबित; बँक खाती गोठविली

बेळगाव : पाटबंधारे खात्यात कंत्राटदारांशी संगनमत करून बनावट दाखले तयार करीत कामच नसताना १६ कोटी रुपये शासकीय अनुदानाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी पाटबंधारे खात्यातील अधिकारी निलंबित झाले आहेत. या अधिकाऱ्यांची वयक्तिक संपत्ती देखील विक्रीवर बंदी घालण्यात आली असून बँक खाती गोठविण्यात आली आहेत.

पाटबंधारे खात्याच्या हिप्परगी नाला विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात हा प्रकार घडला आहे. याबाबत तक्रार आल्याने त्याची चौकशी हाती घेण्यात आली. यात दोघा कंत्राटदारांसह पाटबंधारे खात्याचे मुख्य लेखाधिकारी एस. एन. वरदराजू, लेखा अधीक्षक डी. सी. शीला, विनायक अर्कसाली, प्रथम दर्जा लेखा सहायक, अनिल जाधव, शरणप्पा, सद्या स्मार्ट सीटी बेळगावमध्ये मुख्य महसूल अधिकारी असलेले एम. एम. मिर्जा, जमखंडी काडा कार्यकारी अभियंता दीपक मुडलगी यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा: वानखेडे कुटुंबियांविरोधातील नवाब मलिकांच्या आरोपांना लागणार ब्रेक!

यासह या प्रकरणात सहभागी असलेले अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असून त्यांची संपत्ती गोठविली जात आहे. प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पथकाला कामाचे बिल आणि अनुदान मंजुरीत दोष आढळून आला आहे. तसेच आठ बनावट बिले तयार करण्यात आली असून पाच बिलांवर कंत्राटदारांची सही नाही. बिलावर लेखा अधीक्षक, मुख्य लेखाधिकारी व इतरांच्या सह्या असून त्या आपण केल्या नाहीत, असा जबाब या अधिकाऱ्यांनी दिला आहे. पण बनावट बिले वापरून अनुदान गैरवापर झाला असल्याचे आढळून आल्याने सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.

loading image
go to top