बापरे : या 'शहरात' सापडले इतके टन प्लस्टिक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात प्लास्टिकबंदी  आदेश
मार्च २०१६ मध्ये बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे.

बेळगाव : प्लास्टिक बंदी आदेशाची जोरदार अंमलबजावणी बेळगाव महापालिकेने सुरू केली आहे. सोमवारी (ता.३) महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहराच्या मध्यवर्ती भागात कारवाई करून तब्बल एक टन प्लस्टिक जप्त केले. या कारवाईत ५ घाऊक तर ७ किरकोळ प्लास्टिक विक्रेत्यांच्या अस्थापनांवर छापे टाकले. 

या बारा ठिकाणी मिळून १ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल ८२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. डिसेंबर महिन्यातही महापालिकेने कारवाई केली होती, त्यावेळी ४२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला होता. त्यानंतर प्लॅस्टिकविरोधात मोठी कारवाई झाली नव्हती.

शहापूर व वडगाव विभागातील आरोग्य निरीक्षकांनी काही अस्थापनांवर कारवाई केली होती, पण ती कारवाई किरकोळ स्वरूपाची होती. महापालिकेने सोमवारी अचानक मोठी कारवाई केली. शशीधर कुरेर महापालिका आयुक्त असताना २०१७ साली एकदा अशीच मोठी कारवाई करण्यात आली होती. त्या कारवाईत प्रदूषण नियंत्रण मंडळानेही सहभाग घेतला होता. यावेळी मात्र केवळ महापालिकेने कारवाई केली आहे. पर्यावरण अभियंते आदिलखान पठाण, आरोग्य निरीक्षक सादिक धारवाडकर, व्ही एस कांबळे, श्री आदिवासी यांनी कारवाईत सह

हेही वाचा- इस्लामपूर नगरपालिकेत जोरदार खडाजंगी....

अचानक  सुरू केली कारवाई

बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात प्लास्टिकबंदी  आदेश
मार्च २०१६ मध्ये बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे. बंदी लागू झाल्यावर काही दिवस महापालिकेने शहरात जोरदार कारवाई केली, पण कालांतराने कारवाई थांबली. त्यानंतर शहरात प्लास्टिकचा राजरोस वापर सुरू झाला. आता पुन्हा म्हणजे २ ऑक्टोबर २०१९ पासून प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. हरित लावादचे चेअरमन सुभाष आडी यांनी तर बेळगावात तीन बैठका घेऊन शंभर टक्के प्लास्टिकबंदी लागू करण्याचा आदेश दिला आहे.

हेही वाचा-  सावधान : फॅशन म्हणून किल्ला भटकंतीस येताय......

धडक कारवाई

प्लॅस्टिबंदीबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत धडक कारवाई सुरू केली आहे. सोमवारची कारवाई हा त्याचाच एक भाग होता. महापालिका आयुक्त के एच जगदीश यांच्या आदेशावरून ही कारवाई झाल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. या कारवाईत सातत्य ठेवण्याची जबाबदारी आता महापालिकेची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum Karnataka Plastic Ban Belgaum Marathi News