Belgaum : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रमाकांत कोंडुसकर उमेदवारी

जनमताच्या आधारे झाली निवड
रमाकांत कोंडुसकर
रमाकांत कोंडुसकरsakal

बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत असलेली उत्सुकता शनिवारी (ता. १५) संपली. जनमताचा आधार घेत रमाकांत कोंडुसकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवार निवड प्रक्रियेवेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे मराठा मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

समितीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी दक्षिण मतदारसंघातून माजी आमदार मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, नगरसेवक रवी साळुंखे, आप्पासाहेब गुरव, ॲड. रतन मासेकर, वल्लभ गुणाजी यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, किणेकर व गुणाजी यांनी माघार घेतल्याने सहाजणांमधून उमेदवार निवडण्यासाठी निवड समितीची बैठक झाली. निवड समितीचे अध्यक्ष नेताजी जाधव प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित राहिल्याने अनिल अमरोळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी निवड समितीचे ८५ सदस्य उपस्थित होते.

सुरवातीला जनमताचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर इच्छूक उमेदवारांना जनमताचा कौल सांगून सर्वांनी चर्चा करुन निर्णय घेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर नगरसेवक साळुंखे, श्री. गुरव यांनी माघार घेतली. त्यानंतर श्री. शेळके, ॲड. रतन मासेकर यांच्याशी चर्चा करुन अमरोळे, महेश जुवेकर, दत्ता उघाडे, राजू बिर्जे व महादेव पाटील यांच्या समितीने जनमताच्या आधारे श्री. कोंडुसकर यांची निवड जाहीर केली.

निवड जाहीर झाल्यानंतर निवड कमिटीतर्फे कोंडुसकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी इच्छुक असलेल्या इतर उमेदवारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय व्हावा यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला. समितीने आतापर्यंत पाच उमेदवारांची उमेदवारी जाहीर केली असून लवकरच निपाणीतील उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com