esakal | 'बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता कायम ठेवा'
sakal

बोलून बातमी शोधा

'बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता कायम ठेवा'

चार दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषिकांना पालिकेवर भगवा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

'बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता कायम ठेवा'

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : बेळगाव महापालिकेवर (Belgaum Election 2021) मराठी भाषिकांची सत्ता कायम ठेवा आणि मराठी माणसाच्या एकतेची वज्रमुठ दाखवून द्या, असे आवाहन महाराष्ट्राचे (Maharashtra) जल संपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शहरवासीयांना केले आहे. बेळगाव महानगरपालिकेची (Belgaum Municipal Corporation) निवडणूक सीमाप्रश्नाच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाची असल्याने महाराष्ट्राचेही या निवडणूकीकडे लक्ष लागून राहिले आहे.

चार दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठी भाषिकांना पालिकेवर भगवा फडकवण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर बुधवारी जल संपदा मंत्री पाटील यांनी याबाबतचे पत्रक जाहीर केले असून बेळगाव महापालिका ही सीमालढ्याचा केंद्रबिंदू आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती (MA Samiti) व मराठी भाषिकांचे वर्चस्व राहिले आहे. त्याचप्रमाणे यावेळीही मराठी भाषिकांनी निवडणुकीत आपली ताकद दाखवून द्यावी.

हेही वाचा: जलसंपदामंत्री 'करेक्ट कार्यक्रमाच्या' तयारीत

गेल्या ६५ वर्षांपासून बेळगाव व सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून अन्याय केला जात आहे. सीमावासियांचे भाषिक अधिकार डावलले जात आहेत. मराठी शाळा बंद करुन कन्नड माध्यमाच्या शाळा सुरु केल्या जात आहेत. मराठी भाषिकांना कन्नड बोलण्याची सक्ती केली करण्यासह अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या युवकांवर राजद्रोह व इतर प्रकारचे गुन्हे दाखल केले जात आहेत. आस्थापनांवरील मराठी फलकांचे दडपशाहीने कानडीकरण केले जात आहे. मराठी चित्रपटही बंद पाडले जात असून मराठी साहित्य संमेलनाला परवानगी दिली जात नाही.

विविध प्रकरांतून मराठी भाषिकांना त्रास दिला जातो तसेच काही कन्नड संघटनांना पुढे करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जात असून महापालिके समोर अनधिकृतरित्या लाल-पिवळा ध्वज फडकवण्यात आला आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांपासून सीमावासियांना वंचित राहावे लागत आहे. या सर्व गंभीर आणि संविधानविरोधी गोष्टींना आळा घालण्यासाठी, बेळगावात मराठी भाषिकांची एकीची वज्रमूठ दाखवण्यासाठी महापालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता स्थापित होणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्र सरकार सदैव सीमावासियांच्या पाठिशी आहे, असे मंत्री पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; 'बस'सेवा पूर्ण क्षमतेने सुरु होणार

loading image
go to top