esakal | विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; 'बस'सेवा पूर्ण क्षमतेने सुरु होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum Bus

प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने बसेसची संख्या ७० टक्क्यापर्यंत वाढवण्यात आली होती.

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; 'बस'सेवा पूर्ण क्षमतेने सुरु होणार

sakal_logo
By
विनायक जाधव

बेळगाव : वायव्य परिवहन महामंडळाने परिवहन सेवा पूर्ण पूर्ण क्षमतेने सुरू केली आहे. माध्यमिक शाळांचे नववी ते दहावीचे वर्ग आणि पदवी पूर्व महाविद्यालय सुरू करण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांची 'बसेस'ना होणारी गर्दी लक्षात घेऊन परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (belgaum update)

कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे २७ एप्रिलपासून परिवहन सेवा बंद करण्यात आली होती. अखेर संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर ६ जून रोजी सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र सेवा सुरू करताना केवळ ३० टक्के बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच बसमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी भरण्याचीही अट होती. कोरोना नियमावलीचे पालन करून बससेवा सुरू करण्यात आली होती. प्रारंभी महिनाभर नियमांचे काटेकोरपणे पालन झाले. नंतर प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने बसेसची संख्या ७० टक्क्यापर्यंत वाढवण्यात आली होती. यासह 'बस'मध्ये कोरोना नियम शिथिल झाले होते. कोणताही शासकीय आदेश नसताना बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेण्यास सुरुवात झाली होती.

हेही वाचा: सायरा बानू यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

आता माध्यमिक आणि पदवीपूर्व महाविद्यालय सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची बससाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पूर्णक्षमतेने सेवा सुरू करण्यात आली आहे. बेळगाव विभागातील सर्वच मार्गावर ही बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच आता बसेस धावणार आहेत. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे प्रवासी संख्या घटल्याने बसचे वेळापत्रक कोलमडले होते. पण आता शाळा सुरू झाल्यामुळे वेळापत्रकाप्रमाणे बसेस धावणार आहेत. त्यात लांब पल्ल्याच्या बसेस, ग्रामीण आणि शहरी बसेसचा समावेश आहे.

बसमध्ये मास्क आवश्यक

बसमध्ये विद्यार्थी प्रवास करीत असल्यामुळे मास्कची सक्ती कायम ठेवणे आवश्यक ठरले आहे. मागील महिनाभरापासून प्रवासी मास्क न लावताच प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होणार असल्याने तसेच आसन क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी आणि प्रवासी बसमध्ये भरले जात असल्याने गर्दी होत आहे. त्यामुळे गर्दीतून होणारा संसर्ग टाळण्यासाठी मास्कची सक्ती कायम राहणे सध्या आवश्यक ठरली आहे.

हेही वाचा: जगप्रसिद्ध लेखकाशी लग्न केलं, पद्माच्या पदरी आली निराशा...

loading image
go to top