esakal | Belgaum Election Result 2021 live - बेळगावात गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगावात गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून  सौम्य लाठीचार्ज

बेळगावात गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटर अंतरापर्यंत जमाबंदी असतानाही उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते. तसेच अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून यावेळी गुलालाची उधळण करत झेंडे मिळवण्यात येत होते. (Belgaum Election Result 2021 live) त्यामुळे जमावबंदीचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करत पांगवले. (Belgaum election results 2021) यामध्ये काही जण जखमी झाले असून मोटारसायकलींचेही नुकसान झाले आहे. (Belgaum Municipal Election Results LIVE)

हेही वाचा: राऊतांचा शब्द खोटा ठरणार; बेळगावात 'भाजप'ची जोरदार मुसंडी

बेळगाव महानगरपालिकेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये मतमोजणी करण्यात आली. (Belgaum Municipal Election Results 2021 Live) यावेळी सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे जरुरीचे होते. मात्र, यावेळी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमावली पायदळी तुडवण्यात आल्याचे दिसून आले. त्याचबरोबर जमावबंदीचेही उल्लंघन करण्यात आले. विविध प्रभागांमध्ये यावेळी प्रथमच भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत जोरदार मुसंडी मारल्याने मतमोजणी केंद्राबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

हेही वाचा: Live Update : बेळगावात गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

जमावबंदी असल्याने कार्यकर्त्यांना पोलिसांनी तेथून जाण्याची वारंवार सूचना करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी अखेर अतिउत्साही कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे झालेल्या पळापळीत अनेकजण जखमी झाले. तसेच मोटरसायकलींचेही नुकसान झाले. पोलिसांनी दिसेल त्याला झोडपून करण्यास सुरुवात केल्याने कार्यकर्ते सैरभैर पळू लागले. त्यानंतर पोलिसांनी पाटील गल्लीपर्यंत सर्वांना पाठलाग करत झोडपून काढले. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

loading image
go to top