बनावट गुटख्याचा २० लाखांचा ऐवज जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

चिक्कोडी - महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असल्याने त्याचा लाभ उठवत कर्नाटक हद्दीतील बोरगाव येथे बनावट गुटखा तयार करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या कारखान्यावर बेळगाव येथील जिल्हा गुन्हा अन्वेषण (डीसीबी) विभागाच्या पथकाने छापा घालून कार, जीप यांसह गुटखा बनविण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे व कच्चा माल असा सुमारे २० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच दोघांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून बोरगाव ते इचलकरंजी मार्गालगत इचलकरंजी येथील राजू पाश्‍चापुरे यांच्या मालकीच्या खोलीत हा व्यवसाय सुरू होता. बनावट गुटखा तयार करण्यात येत असल्याची माहिती डीसीबी पथकाला मिळताच त्यांनी छापा घालून ही कारवाई केली. राजू पाश्‍चापुरेने काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातही हा व्यवसाय सुरू केला होता; पण महाराष्ट्र पोलिसांनी त्यावर बंदी घातली होती.

त्यानंतर त्याने नकली गुटखा तयार करण्यासाठी बोरगाव येथे खोली विकत घेतली व तेथे विविध कंपन्यांच्या नावावरील नकली गुटखा तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला होता.

या अड्ड्यावर डीसीबी पथकाने छापा घालून दोन संशयितांसह मोटार, जीपसह लाखो रुपयांच्या मोठ्या गुटख्याचा साठा व साहित्य जप्त केले. डीसीबी पथकाचे उपनिरीक्षक धर्मट्टी, एम. एन. पुजारी, तालुका वैद्याधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे, हवालदार एल. एन. कुंभारी, बी. एस. कालीकोप्पी, अशोक बजंत्री, दोडाप्पा दयन्नवर, सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संगमेश दिडगीनाळ यांनी ही कारवाई केली. तर या प्रकरणी राजू पाश्‍चापुरे व प्रभाकर बिसेकोप्पे या दोघांना अटक केली असून, सदलगा पोलिस ठाण्यात प्रकरणाची नोंद झाली आहे.

Web Title: Belgaum News fake Gutaka seized