आयटीआय प्रवेशासाठी उद्या अखेरचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

निपाणी - आयटीआय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत शुक्रवारी (ता. 8) पर्यंत होती. मात्र महाराष्ट्रातील दहावीचा निकाल व विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक शासनाने यामध्ये पुन्हा चार दिवसाची मुदतवाढ केली आहे. मंगळवारी (ता. 12) प्रक्रियेसाठी अखेरचा दिवस आहे. 

पहिल्या टप्प्यात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी आल्यामुळे काही काळ प्रवेश प्रक्रिया थंडावली होती. मात्र सुधारीत सॉफ्टवेअर देऊन प्रवेश प्रक्रिया गतीने सुरु केली. निपाणीसह परिसरातून यंदा आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींचा ओढा वाढला आहे. प्रत्येक वर्षी निपाणीसह परिसरातून 3 हजार विद्यार्थी आयटीआय प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क व देणगीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महाविद्यायीन शिक्षण घेणे जिकीरीचे बनले आहे. त्यामुळे यंदा आयटीआयसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. 

चिक्कोडी तालुक्‍यातील आयटीआय केंद्रे
केंद्र*सरकारी*अनुदानित*खासगी
चिक्कोडी*1*1*2
निपाणी*1*1*1
अक्कोळ*1*-*-
सदलगा*1*1*1
अंकली*-*-*2
बोरगाव*-*-*2 
एकसंबा*-*-*2

विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची वाढती संख्या व महाराष्ट्रातील दहावीचा नुकताच लागलेला निकाल यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये चार दिवसाची मुदत वाढ केली आहे. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. प्रवेश प्रक्रिया मोफत असून विद्यार्थ्यांनी शासकीय आयटीआयमधून प्रवेश अर्ज भरावा.
- रवींद्र डॅबेरी,

प्राचार्य, सरकारी आयटीआय, निपाणी

Web Title: Belgaum News ITI admission