बेळगाव : आंबेवाडी येथील नऊ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paschim maharashtra

बेळगाव : आंबेवाडी येथील नऊ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

बेळगाव : आंबेवाडी येथे महाराष्ट्र राज्य फलक उभारल्याच्या खटल्यातून आंबेवाडी येथील नऊ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. जेएमएफसी न्यायालयाने हा आदेश बजावला आहे.

पी. के. तरळे, शिवाजी राक्षे, भुजंग ढोपे, शंकर तरळे, भाऊ तरळे, मल्लाप्पा सांबरेकर, विनोद कातकर, महेश कणबरकर, दीपक अतिवाडकर आणि भाऊ कणबरकर (सर्वजण रा. आंबेवाडी) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. सन २०१५ मध्ये येळ्ळूर गावाच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य फलक पाडविण्यात आल्यानंतर सीमाभागात याचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर त्याचे पडसाद म्हणून आंबेवाडी गावात देखील महाराष्ट्र राज्य फलक उभारण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी काकती पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन वरील नऊ जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: बेळगाव : पोलिस आयुक्तालयाच्या वतीने देखील प्रॉपर्टी परेडचे आयोजन

या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र सरकारच्यावतीने सबळ पुरावे सादर करण्यात न आल्याने न्यायालयाने पुराव्याअभावी वरील सर्व संशयिताची निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्या वतीने ऍड. श्याम पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड, महेश मोरे आदींनी काम पाहिले.

loading image
go to top