बेळगाव : पोलिस आयुक्तालयाच्या वतीने देखील प्रॉपर्टी परेडचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paschim maharashtra

बेळगाव : पोलिस आयुक्तालयाच्या वतीने देखील प्रॉपर्टी परेडचे आयोजन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी प्रॉपर्टीपरेडचे आयोजन केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ उशिरा जागे झालेल्या पोलिस आयुक्तालयाच्यावतीने देखील आज प्रॉपर्टी परेडचे आयोजन करण्यात आले होते. २०१९ पासून २०२१ पर्यंत सुमारे ३ कोटी ५४ लाख ५१ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यापैकी १ कोटी ५१ लाख ४० हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल आज पोलीस आयुक्तालयाच्या आवरणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी फिर्यादी आणि संबंधितांच्या वारसदारांना परत करण्यात आला.

पोलीस मुख्यालयाच्या आवारात आज प्रॉपर्टी परेडचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, पी. व्ही. स्नेहा यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. २०१९ मध्ये १ कोटी ४ लाख ४२ हजार पाचशे २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०२० मध्ये १ कोटी ९५ लाख ४२ हजार ८२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: Mumbai Police : गँगस्टर फहिम मचमचच्या हस्तकाला अटक

तर सीइएन पोलिसांनी २०२० मध्ये ५४ लाख ६६ हजार ७१५ रुपये किमतीचा ३८ किलो ६६५ ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे. असा एकूण ३ कोटी ५४ लाख ५१ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोन्या- चांदीचे दागिने मोटारसायकली, मोटारी यासह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी शहरातील सर्व एसीपी, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

loading image
go to top