esakal | बेळगाव : शहर सेवेतील बसची माहिती आता प्रवाशानं मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

GPS System

बेळगाव : शहर सेवेतील बसची माहिती आता प्रवाशानं मिळणार

sakal_logo
By
विनायक जाधव

बेळगाव - शहर सेवेतील ६२ बसमध्ये जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) बसविण्यात आले आहे. यामुळे बसची इत्यंभूत माहिती आता प्रवाशानं मिळणार आहे. शहर सेवेतील इतर बसेसमध्येही लवकरच ही सेवा कार्यान्वित केली जाणार आहे.

शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या १० बसथांब्यावर डिस्प्ले फलक आणि डिजिटल वेळापत्रक फलक बसविण्यात आला आहे. तर ७ बसस्थानकावर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासह सिटीजन मोबाईल ॲप तयार करण्यात आला असून या सर्व ठिकाणी जीपीएस सिस्टम बसविलेल्या बसेसची माहिती उपलब्ध होणार आहे. बसमध्ये जीपीएस बसवण्यात आलेला असल्यामुळे बस कुठे आहे? आणि किती वेळेत ती थांब्यावर पोहोचेल? याची माहिती मोबाईल डिस्प्ले फलकावर प्रवाशांना दिसणार आहे.

हेही वाचा: CA परीक्षेत सांगलीचा झेंडा: 11 जण उत्तीर्ण; दोन मुलींचा समावेश

मागील वर्षभरापासून स्मार्ट बसथांब्यावर डिजिटल फलक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असली तरी बसमध्ये जीपीएस बसविण्याचे काम शिल्लक राहिले होते. आता बसमध्ये जीपीएस बसविण्यात आले असल्याने बसची।माहिती स्मार्ट बसथांब्यावर प्रवाशानं वेळोवेळी समजणार आहे. ज्या जीपीएस बसविण्यात आलेल्या बसेस कंट्रोल रूमशी कनेक्ट असणार असून बस कुठून कुठे जात आहे? ती किती वेळात पुढील स्टॉपवर पोहोचेल आदी सर्व माहिती प्रवाशांना मिळणार आहे. परिवहन मंडळाकडून आणखीन एक मोबाईल ॲप तयार केला जात असून खासगी सहभागातून स्मार्ट कार्ड प्रवाशानं दिले जाणार आहे. हे स्मार्ट कार्ड प्रीपेड स्वरूपाचे असतील. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रवाशाला तिकीट काढावे लागणार नसून या कार्डमधून ऑटोमॅटिक ते डेबिट होतील. वर्षभरापूर्वीच ही संकल्पना राबविण्यात आली आहे. पण कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे हे काम रखडले होते. अखेर त्यांना मुहूर्त सापडला आहे.

loading image
go to top