Pig : सशस्त्र दरोड्यात चोरी केलेली डुकरे ‘एपीएमसी’तील गोदामात

महाराष्ट्रातील आजरा तालुक्यातील खानापूर येथील सशस्त्र दरोड्यात चोरण्यात आलेली डुकरे येथील ‘एपीएमसी’मधील गोदामात ठेवण्यात आली होती.
Pig
Pigsakal
Summary

महाराष्ट्रातील आजरा तालुक्यातील खानापूर येथील सशस्त्र दरोड्यात चोरण्यात आलेली डुकरे येथील ‘एपीएमसी’मधील गोदामात ठेवण्यात आली होती.

बेळगाव - महाराष्ट्रातील आजरा तालुक्यातील खानापूर येथील सशस्त्र दरोड्यात चोरण्यात आलेली डुकरे येथील ‘एपीएमसी’मधील गोदामात ठेवण्यात आली होती. आजरा पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली. या दरोडा प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी ‘एपीएमसी’मधील गोदामात डुकरे लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यामुळे आज पहाटे संशयितांसह आजरा पोलिस बेळगावला पोचले. त्यांनी ‘एपीएमसी’ येथील गोदामात ठेवलेली डुकरे ताब्यात घेतली. या प्रकारामुळे बेळगावच्या ‘एपीएमसी’मध्ये मात्र खळबळ उडाली आहे.

बुधवारी दिवसभर डुकरे तेथील गोदामातच होती, पण त्याचा थांगपत्ता तेथील एपीएमसीचे अधिकारी, कर्मचारी किंवा तेथील व्यापाऱ्यांना लागला नव्हता. गुरुवारी सकाळी आजरा पोलिसांनी ते गोदाम उघडून त्यातील डुकरे ताब्यात घेतल्यावर सर्वांना याची माहिती मिळाली. त्यामुळे एपीएमसीमधील गोदामांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

एपीएमसीत अनेक गोदाम आहेत. भाजीपाला, धान्य व अन्य साहित्य ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. आधी मतपेट्या किंवा ईव्हीएम ठेवण्यासाठीही त्यांचा वापर केला जात होता. निवडणूक विभागाने हिंडलगा येथे स्वतंत्र गोदाम बांधल्यामुळे एपीएमसीतील गोदामांचा वापर बंद झाला आहे. मात्र, या बंद गोदामांचा गैरवापर झाला आहे.

मंगळवारी रात्री आजरा तालुक्यातील खानापूर येथे माजी सरपंच पूनम गुरव यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला. त्या दरोड्यात सहभागी असलेल्या सुमारे १५ ते २० जणांनी २२० पाळीव डुकरे, सोने, काजूगर, काजू बी व रोकड अशी नऊ लाख रुपयांची लूट केली. या घटनेनंतर दरोड्याचा तपास करण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली होती. त्यातील एक पथक बुधवारी बेळगाव शहरातील रुक्मिणीनगर येथे आले होते.

तेथील रवी नाईक नामक संशयिताला त्यांनी ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली असता त्याने दरोडा टाकल्याचे कबूल केले होते. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आजरा पोलिसांनी बुधवारी रात्री बेळगावात येवून आणखी दहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यावेळी चोरी करण्यात आलेली डुकरे एपीएमसी येथील गोदामात ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

डुकरांची अखेर सुटका

आजरा येथे दरोडा टाकल्यावर डुकरे वाहनात भरून थेट एपीएमसी येथे आणण्यात आली. तेथील एका गोदामाचे शटर उघडून आत ठेवण्यात आली. गुरुवारी सकाळी त्या डुकरांची सुटका गोदामातून झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com