Belgaum: प्रियांका कुलकर्णी राज्यात द्वितीय

९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत बारावीची परीक्षा झाली होती. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील २४ हजार ६५४ विद्यार्थांनी परिक्षा दिली होती. यात २० हजार ७४८ फ्रेश विद्यार्थी होते. यापैकी ७३.९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Belgaum
Belgaumsakal

बेळगाव - बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याच्या बारावीच्या निकालात वाढ झाली असून, बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल ७३.९८ टक्के लागला आहे.

तसेच, निकालात बेळगाव शैक्षणिक जिल्हा २५ व्या, तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा राज्यात १६ व्या क्रमांकावर असून, लिंगराज महाविद्यालयाच्या प्रियांका कुलकर्णी हिने कला शाखेत राज्यात द्वितीय, तर सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय बैलहोंगल येथील सहना कटकोळ हिने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे.

९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत बारावीची परीक्षा झाली होती. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील २४ हजार ६५४ विद्यार्थांनी परिक्षा दिली होती. यात २० हजार ७४८ फ्रेश विद्यार्थी होते. यापैकी ७३.९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गेल्या वर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्हा ५९.८८ टक्कांसह बारावीच्या निकालात राज्यात २८ व्या क्रमांकावर होता. मात्र यावेळी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने बेळगाव शैक्षणिकची तीन क्रमांकाने सुधारणा झाली आहे.

५ एप्रिलपासून पेपर तपासणी सुरू होती. शिक्षण खात्याने मूल्यमापकांची संख्या वाढवली होती. त्यामुळे परीक्षा झालेल्या काही दिवसातच निकाल जाहीर करणे सोपे झाले आहे. सुरुवातीला बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात जाहीर केला जाईल, अशी माहिती दिली होती.

Belgaum
Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

मात्र पेपर तपासणीचे काम पूर्ण झालेल्या आठ दिवसात निकाल जाहीर केल्याने विद्यार्थ्यांतून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.

निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी शिक्षण खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन किती गुण मिळाले आहेत, याची चाचपणी करण्यास सुरुवात केली होती. यावेळी बेळगाव शहरातील अनेक पदवी पूर्व महाविद्यालयांच्या निकालात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

लिंगराज महाविद्यालयाच्या प्रियंका कुलकर्णी हिने कला शाखेत ६०० पैकी ५९२ गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. बैलहोंगल येथील शासकीय पीयु महाविद्यालयाची विद्यार्थिनी सहना कडकोळ हिने कला शाखेत ६०० पैकी ५९१ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

प्रियंका हिने यशाचे श्रेय आई दीपाली आणि वडील चिदंबर प्रभाकर कुलकर्णी यांना दिले. प्रियंकाचे प्राथमिक शिक्षण लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये झाले. लहानपणापासूनच ती अभ्यासू आहे. लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये प्राचार्या लक्ष्मी इंचल व शिक्षकांनी तिला अभ्यासासोबतच खेळ, संगीत, विविध फेस्टिव्हल अशा सर्व उपक्रमांत प्रोत्साहन दिले.

Belgaum
Mumbai : ट्विटवरील 'ब्लु टिक' निघून गेली, नेत्यांचे पुढचे पाऊल काय ?

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा बारावीचा निकाल

एकूण परीक्षार्थी*२४,६५४

उत्तीर्ण*१७१२८

------------------

फ्रेश विद्यार्थी

एकूण परीक्षार्थी*२०,७४८

उत्तीर्ण*१५,३५०

------------------

बहिस्थ विद्यार्थी

एकूण विद्यार्थी*११०८

उत्तीर्ण*४२१

----------------

रिपीटर्स

एकूण विद्यार्थी*२७९८

उत्तीर्ण*१३५७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com