esakal | आरटीईच्या जागा रिक्‍त : फक्त 118 विद्यार्थ्यांनीच  घेतला प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum RTE admission Vacancy free

शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत खाजगी शिक्षण संस्थाच्या काही  शाळांमध्ये 25 टक्‍के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

आरटीईच्या जागा रिक्‍त : फक्त 118 विद्यार्थ्यांनीच  घेतला प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोनाचा  फटका आरटीई प्रवेश प्रक्रियेलाही बसला असुन बेळगाव  जिल्ह्यात आरटीई अंतर्गत फक्त 118 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 2009 मध्ये आरटीई लागू झाल्यापासून पहिल्यांदाच 20 टक्के जागाही भरती झालेल्या नाहीत त्यामुळे आरटीई लागु झाल्यापासुन पहिल्यांदाच आरटीई प्रवेशाकडे पालकांनी मोठ्‌या प्रमाणात पाठ फिरविली आहे. त्यामुळे बेळगाव  जिल्ह्यात आरटीईच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्‍त राहिल्या आहेत. 


2009 मध्ये सरकारने आरटीई लागू झाल्यानंतर दरवेळी प्रवेशासाठी अधिक प्रमाणात अर्ज दाखल करण्यात येत होते मात्र यावेळी शिक्षण खात्याने आरटीई प्रवेशाबाबत सुरुवातीला कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नव्हता त्यामुळे 2020 - 21 मध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार की नाही अशी शंका उपस्थित झाली होती मात्र  त्यानंतर शिक्षण खात्याने मार्चच्या सुररुवातीला आरटीई प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार पालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले मात्र लॉकडाऊनमुळे प्रवेश प्रक्रियेला मोठा विलंब झाला त्यामुळे ऑनलाईन अर्ज दाखल करणाऱ्या पालकांची संख्या कमी झाली तसेच त्यामुळे आरटीई प्रवेशाबाबत शिक्षण खात्याने वेळीच निर्णय घ्यावा अशी मागणी होत होती. ऑगस्ट महिन्यात शिक्षण खात्याने प्रवेश यादी जाहीर करण्यात आली. मात्र कोरोनाच्या संकटामुळे शाळा कधी सुरु होतील याबाबत अनिश्‍चितता असल्याने यादीत नाव येऊन देखिल अनेकानी प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे अनेक शाळात जागा उपलब्ध असूनही रिक्‍त राहिल्या आहेत. 


शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत खाजगी शिक्षण संस्थाच्या काही  शाळांमध्ये 25 टक्‍के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.  त्यामुळे आरटीई लागू झाल्यापासून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात आतापर्यंत हजारो  विद्यार्थ्यांनी आरटीईच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र आरटीईतून दिल्या जाणाऱ्या मोफत प्रवेशामुळे राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर सरकारने 2019 पासून आरटीईच्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या कमी झाली आहे.

हेही वाचा- किती आले किती गेले, मुंबईकरांचे प्रेम मात्र शिवसेनेवरच 

नव्या नियमानूसार घराच्या परीघापासून दिड किलो मिटर परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा उपलब्ध नसेल तरच पालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येतो. त्यामुळे आरटीईसाठी उपलब्ध असलेल्या शाळा व जागांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आरटीईला फटका बसत असतानाच यावेळी अनेक पालकांनी जागा उपलब्ध असुनही प्रवेशाकडे पाठ फिरविल्याने येणाऱ्या काळात आरटीई प्रवेशाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होण्याची शक्‍यता असून फक्त 118 विद्यार्थ्यांनी यावेळी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे शिक्षण खात्यातुनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

कोरोनामुळे शाळा सुरू झालेल्या नाहीत तसेच नव्या नियमाचा  आरटीईला मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्याचे आवाहन करूनही कमी प्रमाणात  अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे अनेक जागा रिक्त राहिल्या आहेत 
ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी

संपादन- अर्चना बनगे

loading image