बेळगाव : सिग्नल बंदची समस्या यंदे खुट येथे कायम

शहरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या यंदे खुट येथील सिग्नल सातत्याने बंद पडत आहे.
सिग्नल
सिग्नल sakal

बेळगाव : स्मार्ट सिटीअंतर्गत शहराचा विकास सुरू असला तरी वाहतूक समस्येचे ग्रहण मात्र अद्याप सुटलेले नाही. वाहतूक सिग्नलांची वेळेवर देखभाल करण्यात येत नसल्याने अनेक ठिकाणचे सिग्नल सातत्याने नादुरुस्त बनत आहेत. शहरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या यंदे खुट येथील सिग्नल सातत्याने बंद पडत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात सोळा ठिकाणी नवीन वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत, मात्र जुन्या सिग्नलच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ते वारंवार नादुरुस्त बनत आहेत. यंदे खुट येथील सिग्नल विद्युतपुरवठ्यावर सुरू असून ज्यावेळी विद्युतपुरवठा खंडित होईल, त्यावेळी सिग्नल बंद पडत आहे. या सिग्नलला सौर ऊर्जेचा पॅनल किंवा बॅटरी बॅकअप नसल्याने ही समस्या उद्भवत आहे. सिग्नलची देखभाल करण्यासाठी ठेकेदाराची निवड करण्यात आली नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे, पण अचानक सिग्नल बंद पडल्याने त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा उडत आहेत. त्यामुळे वाहतूक नियमन करण्याचा भार पोलिसांवर पडत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या निर्माण असूनही त्याची दुरुस्ती करण्याकडे मात्र, स्मार्ट सिटी किंवा पोलिसांनी लक्ष घातलेले नाही.

त्यामुळे सरकारी काम आणि बारा महिने थांब असा प्रकार सुरू असल्याचे यावरून दिसून येते. सातत्याने बंद पडणाऱ्या यंदे खुट येथील सिग्नलची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बॅरिकेड्स लावून वनिता विद्यालयाकडून शहरात येणारी वाहने आणि समादेवी गल्लीकडून वनिता विद्यालयाकडे जाणाऱ्या वाहनांना पवन हॉटेल क्रॉस आणि धर्मवीर संभाजी चौकातून वळसा घालून ये-जा करावी लागत आहे.

‘यंदे खुट येथील सिग्नलचा विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने सिग्नल बंद आहे. वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. लवकरच दुरुस्ती केली जाईल.

मंजुनाथ नाईक,निरीक्षक, दक्षिण वाहतूक पोलिस ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com