esakal | बेळगाव: पराभूत महिला उमेदवाराच्या घरावर दगडफेक; पाच अज्ञातांविरोधात गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

पराभूत महिला उमेदवाराच्या घरावर दगडफेक; 5 जणांवर गुन्हा दाखल

पराभूत महिला उमेदवाराच्या घरावर दगडफेक; 5 जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : एकीकडे महानगरपालिकेची निवडणूक शांततेत पार पडत असतानाच दुसरीकडे एका पराभव झालेल्या महिला उमेदवाराच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना सोमवार (ता. ६) दुपारी न्यू गांधीनगर येथे घडले आहे. याप्रकरणी सलिमा गोकाकवाले (रा. न्यू गांधीनगर) यांनी माळमारुती पोलीस ठाण्यात पाच अज्ञातांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास चालविला आहे.

हेही वाचा: सातारा: जावली तालुक्यात चंदन चोरी करणारी टोळी गजाआड

सलिमा यांनी प्रभाग क्रमांक ३७ मधून अपक्ष म्हणून महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांच्यामुळे त्याच प्रभागातील दुसऱ्या उमेदवाराला देखील पराभव स्वीकारावा लागल्याने काहीनी आज त्यांच्या घरावर दगडफेक केली. त्यामुळे त्यांच्या घरच्या खिडकीच्या काचा फुटल्या.

दगडफेकीची घटना घडल्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर सलीम यांनी पाच जणांविरोधात फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास चालविला आहे.

loading image
go to top