Belgaum : अपुऱ्या बस सेवे विरोधात विद्यार्थी आक्रमक; मच्छे येथे रास्ता रोको आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपुऱ्या बस सेवे विरोधात विद्यार्थी आक्रमक

अपुऱ्या बस सेवे विरोधात विद्यार्थी आक्रमक

बेळगाव : मच्छे आणि परिसरातील विद्यार्थी दररोज मोठ्या संख्येने शहरात शिक्षणासाठी येत असतात. मात्र अपुऱ्या बस सेवेमुळे त्रास होत असल्याने आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी नेहरूनगर मच्छे येथे रास्ता रोको केला. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले. बेळगावहुन मच्छे गावाला स्वतंत्र बस सेवा नसल्‍याने या भागातील विद्यार्थ्यांना खानापूर व इतर भागातून येणाऱ्या बसवर अवलंबून राहावे लागते. मात्र खानापूर कडून येणाऱ्या बस अगोदरच फुल भरलेल्या असतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी ताटकळत प्रवास करीत असतात त्यामुळे सकाळच्या सत्रात मच्छे येथे बस थांबविली जात नाही.

हेही वाचा: हस्ताक्षरावरून पटली ओळख? गडचिरोलीच्या चकमकीत 'ते' चौघे ठार?

त्यामुळे शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे या मार्गावर अधिक प्रमाणात बस सोडाव्यात अशी मागणी सातत्याने विद्यार्थ्यांमधून केली जात आहे. मात्र शाळा व महाविद्यालये पूर्वपदावर येऊन देखील बस सेवा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे दररोज नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे मच्छे आणि परिसरातील विद्यार्थी आक्रमक झाले व त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनास सुरुवात केली. खानापूर कडून बेळगावकर येणारी वाहने रोखून धरली. त्यामुळे सकाळच्या सत्रात रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्याने उद्यमबाग आणि परिसरात कामाला जाणाऱ्या लोकांनाही अडकून राहावे लागले होते.

विद्यार्थ्यांनी रास्तारोको करण्यास सुरुवात केल्यानंतर सकाळी व संध्याकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या काळात अधिक प्रमाणात बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. तसेच बस सेवा सुरळीत न केल्यास दररोज रास्ता रोको करण्याचा इशाराही यावेळी विद्यार्थ्यांनी दिला. त्यानंतर परिवहन विभागाने मच्छी देशी मार्गावर अधिक बसेस सोडल्या जातील असे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा: नक्षलवादाला शहरी चेहरा देण्याचा मिलिंद तेलतुंबडेचा प्रयत्न

परिवहन मंडळातर्फे बसेस सुरळीतरित्या सुरू करण्यात आल्या आहेत. अशी माहिती देण्यात येत असली तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अपुऱ्या बससेवेचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बस पूलफुल असल्याने विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना पाय ठेवायला देखील जागा नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे याची दखल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे असे मत विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.

loading image
go to top