esakal | बेळगाव : विद्यार्थ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या

विद्यार्थ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : मला माफ करा परीक्षेला सामोरे जाने अवघड जाण्यासह महाविद्यालयाचे शुल्क भरणे देखील शक्य नसल्याची डेथ नोट लिहून इचलकरंजी जि. कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. भरत पाटील (वय २१, मूळ रा. इचलकरंजी जि. कोल्हापूर सद्या रा. नेहरूनगर) असे त्याचे नाव असून घटनेची नोंद एपीएमसी पोलिस ठाण्यात झाली आहे.

मूळचा इचलकरंजी येथील राहणार भरत हा गेल्या काही वर्षापासून शिक्षनानिमित्त नेहरूनगर येथे भाड्याच्या घरी राहत होता. वंटमुरी येथील मराठा मंडळ महाविद्यालयात तो डी फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. घरची आर्थिक परिस्थिती हलक्याची असल्याने तो कॉलेज सुटल्यानंतर नजीकच्या एका हॉटेलमध्ये कामाला जात होता. मात्र, परीक्षेला सामोरे जाणे कठीण वाटत आहे.

हेही वाचा: "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिन्हं नाहीत" - मुंबई महापालिका

तसेच महाविद्यालयाची फी भरणे देखील आपल्याला शक्य नसल्याने आपण आत्महत्या करत आहे असा शेवटचा फोन त्याने आपल्या आईला केला होता. तसेच आपल्या मित्रांना डेथ नोट व्हाट्सअपद्वारे पाठवून राहत्या घरात गळफास घेतला. मुलाने आत्महत्या करत असल्याचा फोन केल्यानंतर आईने आपल्या नातेवाईकांना ही माहिती देऊन मुलाच्या रूमकडे जाण्याची माहिती दिली. मात्र, तोपर्यंत भरतने गळफास घेतला होता. घटनेची माहिती समजताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

loading image
go to top