esakal | Belgaum Election Result 2021 Update:काॅग्रेसच्या जारकीहोळींची आगेकूच: अंगडी यांच्या मताधिक्यात घट; शेळकेंचे अर्धशतक

बोलून बातमी शोधा

null

Belgaum Election Result 2021 Update: काॅग्रेसच्या जारकीहोळींची आगेकूच: अंगडी यांच्या मताधिक्यात घट; शेळकेंचे अर्धशतक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: भाजप उमेदवार मंगला अंगडी यांचे मताधिक्य घटले आहे. सुरवातीपासून सुमारे दहा ते चौदा हजार मताधिक्यांनी त्या आघाडीवर होत्या. पण, आता मताधिक्यात घट होऊन त्या सुमारे सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार यांना ४७ हजार मते पडले असून, ५० हजाराच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. सुरवातीला अगदी नगण्य मानण्यात येणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवारांनी शुभम शेळके यांच्या लक्षवेधी कामगिरीमुळे मराठी भाषिक आणि सीमाभागातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

बेळगाव लोकसभा पोटनिवणुकीसाठी चुरशीने झालेल्या मतदानामध्ये मंगला अंगडी यांनी आघाडी घेतली होती. १० ते १२ हजार मताधिक्यांनी त्या आघाडीवर होत्या. परंतु, ५० टक्के मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आघाडीचा टक्का घटला आहे. सहा हजार मतांनी आघाडी घेतली आहे. यामुळे सुरवातीला भाजप गोटात चैतन्याचे वातावरण होते. पण, आता थोडीशी चिंता सुरु आहे.

हेही वाचा- Belgaum LokSabha Update:भाजप मंगला अंगडी यांना 10 हजाराची आघाडी तर काँगेस, म. ए. समिती पिछाडीवर

दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत भाजप उमेदवार मंगला आघाडी यांना १ लाख ८३ हजार २५७ मते पडली आहेत. सतीश जारकीहोळी यांना १ लाख ७७ हजार १२२ मते पडली आहेत. महाराष्ट्र एकीरण समितीचे उमेदवार ४८ हजार ८१२ मते पडली आहेत. शेळके यांना पडलेली लक्षणीय मते मराठी भाषिकांच्या आशा पल्लवीत करणाऱ्या ठरल्या आहेत.

Edited By- Archana Banage