बोलक्‍या बाहुलीद्वारे 'बेटी बचाव'चे प्रबोधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

ओठ न हलविता बोलण्याची कला सोहम वयाच्या पाचव्या वर्षी शिकला. ज्येष्ठ कलावंत रामदास पाध्ये यांचे व्हिडिओ यूट्यूबवर सतत पाहून त्याने ही कला अवगत केली. सोलापुरातील जादूगार कलावंत गुरुराज मिरजी यांनीही त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. सोहमने सर्व मुलांना उद्देशून नियमित शाळेला जावे आणि छोटू सारख्या मुलांनाही शाळेत आणावे, असा संदेश दिला.

सोलापूर - दमाणी विद्यामंदिरमधील तिसरीत शिकणाऱ्या सोहम श्‍याम येमूल या नऊ वर्षांच्या मुलाने कठपुतली आणि बोलकी बाहुली या कलेतून बालकामगारविरोधी आणि "बेटी बचाव'चे प्रबोधन केले.

ओठ न हलविता बोलण्याची कला सोहम वयाच्या पाचव्या वर्षी शिकला. ज्येष्ठ कलावंत रामदास पाध्ये यांचे व्हिडिओ यूट्यूबवर सतत पाहून त्याने ही कला अवगत केली. सोलापुरातील जादूगार कलावंत गुरुराज मिरजी यांनीही त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. सोहमने सर्व मुलांना उद्देशून नियमित शाळेला जावे आणि छोटू सारख्या मुलांनाही शाळेत आणावे, असा संदेश दिला.

दमाणी शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला भोसले अध्यक्षस्थानी होत्या.

सोनुलीला शिकायचे आहे!
सोहमने सोनुली या आपल्या बाहुलीद्वारे "बेटी बचाव'चे प्रबोधन केले. या बाहुलीने आपल्या वडिलांशी केलेल्या संवादातून "बेटी बचाव'चे महत्त्व त्याने पटवून दिले आहे. आपल्याला या सुंदर जगात येऊन शिकायचे आहे, मोठे व्हायचे आहे, दादाशी खेळायचे आहे अशी हृदयस्पर्शी कथा त्याने तीन मिनिटांत सांगितली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beti bachav Awakening Soham Yemul