भाग्यश्री ओसवाल खुन प्रकरणात पतीला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

सातारा - साताऱ्यात गाजलेल्या रिंकू उर्फ भाग्यश्री ओसवाल खुन
प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. ए. ढोलकिया यांनी आज पतीला 
जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. माहेरून सोने आणण्यासाठी त्याने पत्नीचा
गळा आवळून खून केला होता.

भरत कांतीलाल ओसवाल (वय 31, रा. गुलमोहर कॉलनी, सातारा) असे त्याचे नाव आहे. लग्नापूर्वी रिंकूच्या माहेरच्यांनी 16 तोळे सोन्याचे दागिने देण्याचे मान्य केले होते. मात्र, लग्नावेळी त्यांनी आठ तोळे दागिने घातले. उर्वरित दागिने माहेरून आणण्यासाठी भरत तीचा छळ करत होता. तसेच लग्नाला दोन-तीन वर्षे झाली तरी मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुनही तो वाद घालायचा.

19 ऑक्‍टोबर 2014 रोजी रात्री रिंकूला बहिणीचा फोन आला होता. तेवढ्या भरत
तेथे आला. त्यामुळे सकाळी बोलू असे सांगून तीने फोन कट केला. जेवण  झाल्यावर दोघे बेडरूममध्ये गेले. तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यात त्याने तीचा गळा आवळला. त्यामुळे ती बेशुध्द पडली. रात्री साडेबाराच्या सुमारास भरतने रिंकूला उपचारासाठी नेवूया असे कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर तीला उपचारासाठी येथील एका रुग्णालयात दाखल केले. तेथे तीला मृत घोषीत करण्यात आले होते.

रिंकूच्या मृत्यूविषयी शंका वाटल्याने त्या रुग्णालयातून प्रेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. प्रेताच्या गळ्यावरील खुणा पाहून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबतची महिती शाहूपुरी पोलीसांना दिली. त्यांनी याबाबत रिंकूच्या माहेरच्यांना सांगितले. त्यानंतर नातेवाईक साताऱ्यात आले. सुरवातील ती चक्कर येवून पडल्याचे सांगितले जात होते मात्र, शवविच्छेदनानंतर तीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.

रिंकूची आई चंदा मोहन ओसावाल यांच्या फिर्यादीनुसार भरतवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक पांढरे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. तब्बल पावणेदान वर्षे खटल्याचे कामकाज सुरु होते. या दरम्यान, वैद्यकीय अधिकारी, रिंकूची आई, काका यांच्यासह 11 जणांच्या साक्षी झाल्या. साक्षीदारांच्या साक्षी, परिस्थीतीतजन्य पुरावे व सहायक सरकारी वकील महेश कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्यमानून न्यायाधिश ढोलकिया यांनी भरतला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडांची शिक्षा ठोठावली. सरकारी वकीलांना पोलिस प्रॉसीक्‍यूशन स्कॉडचे उपनिरीक्षक पी. के. कबुले, हवालदार सुनील सावंत, अजित शिंदे, शमशुद्दीन शेख, कांचन बेंद्रे, नंदा झांजुर्णे, शाहूपुरीच्या पैरवी अधिकारी रिहाना शेख यांनी सहकार्य केले

Web Title: In the Bhagyashree Oswal murder case, the husband's life imprisonment