नगर: दुहेरी हत्याकांड प्रकरणी भानुदास कोतकरला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

येरवडा पोलिस ठाण्यात हजेरीसाठी आलेला असताना त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात कोतकरला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे. मात्र, वैद्यकीय कारणास्तव त्याला जामीन देण्यात आलेला आहे. हजेरीसाठी आज तो सकाळी येरवडा पोलिस ठाण्यात आला होता.

नगर : केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पसार असलेल्या भानुदास कोतकरला आज पुण्यात अटक करण्यात आली. केडगावमधील पोटनिवडणुकीनंतर शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या खून प्रकरणात कोतकर संशयीत आरोपी असून, घटनेनंत तो पसार झाला होता. त्याला आज स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. 

येरवडा पोलिस ठाण्यात हजेरीसाठी आलेला असताना त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात कोतकरला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे. मात्र, वैद्यकीय कारणास्तव त्याला जामीन देण्यात आलेला आहे. हजेरीसाठी आज तो सकाळी येरवडा पोलिस ठाण्यात आला होता. तेथे पोलिसांनी केडगाव येथील दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. केडगाव दुहेरी हत्याकांडातील मयत कोतकर व ठुबे यांच्या कुटुंबीयांनी त्याच्या ृअटकेच्या मागणीसाठी शनिवारपासून उपोषण आरंभले होते. 

Web Title: Bhanudas Kotkar arrested in Nagar double murder case