मोहोळच्या व्यापाऱ्यांचा भारत बंदला पाठींबा

मोहोळच्या व्यापाऱ्यांचा भारत बंदला पाठींबा
मोहोळच्या व्यापाऱ्यांचा भारत बंदला पाठींबा

मोहोळ, (सोलापूर): शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने चालू ठेवून देशातील व्यापारी संघटनेने आयोजीत केलेल्या भारत बंदला पाठींबा देत विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार व पोलिस निरीक्षकांला देण्यात आले. भारतातील व्यापारी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यासाठी भारत बंदचे आव्हान केले होते. त्या बंद ला पाठिंबा म्हणून मोहोळ चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने सर्व व्यापाऱ्यांच्या सामुहीक निवेदनाचे आयोजन केले होते.

निवेदनात वॅलमार्ट व फ्लिपकार्ड सोबतचा ऑनलाईन व्यापारी करार त्वरीत रदद् करण्यात यावा. GST चे दोन स्तर करण्यात यावे. मुद्रा कर्ज योजनेची व्याप्ती वाढवावी व व्याजदर कमी करावा. कलम ४११ व ४१२ अंतर्गत सोने चांदी च्या व्यापाऱ्याना अटक करणारा जाचक कायदा रदद् करावा. किरकोळ व्यापारासाठी स्वतंत्र धोरण ठरवून स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, अशा मागण्याचे निवेदन मोहोळचे नायब तहसिलदार जिवन क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आले. याच प्रमाणे शहरातील व्यापाऱ्यांचे बाजारपेठ वाढीसंदर्भात कराव्या लागणाऱ्या उपायाचे निवेदन मोहोळचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांना देण्यात आले.

या वेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीन नाना डोके उपाध्यक्ष शौकत तलफदार सचीव हरीचंद्र बावकर खजिनदार महेश आंडगे, मार्गदर्शक अनील कोरे, अशोक फसके, सचीन कवठे, बाळासाहेब गवळी, रविकीरण कोरे, नागेश पुरानिक, बबलु शेख रणजित भोसले, विजयकुमार कुर्डे प्रशांत झाडे रविंद्र माळी, पप्पु विभुते प्रमोद डोके, अतुल गावडे, सत्यवान देशमुख, पंकज नागटिळक,  शशीकांत सादीगले, उमर शेख नूर इनामदार दादा हेळकर कृष्णात शिंगाडे संदिप गुदगे शिवराज शिदे प्रवीन कारंजकर सचीन कुर्डे आप्पा वाघमोडे, दत्तानंद मोहरे, जवाहर विभुते, सुजीत काळे, अमोल काळे विलास भोसले, अतुल आनंदकर हरी गोटे सोमनाथ पुरानिक, राजेश स्वामी, दिपक शिंदे, सुनिल शेटे, गणेश आदलिंगे, सचिन शिंदे, रावसाहेब माने, संदेश कोरे आदीसह बहुसंख्य व्यापारी उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com