त्याची उंची चार फूट, बक्षिसाची ढाल पाच फूट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

कोल्हापूर - त्याची उंची चार फुटांची; पण त्याला बक्षीस म्हणून मिळालेली ढाल आहे पाच फुटांची. एवढी मोठी ढाल मिळवत त्याने हलगीचा कडकडाट राज्याबाहेर पोचवला आहे. येथील भार्गव संजय आवळे या अवघ्या 14 वर्षांच्या हलगीवादकाने हलगीवादनाच्या विश्‍वात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्याला ढाल बक्षीस मिळाली, हे खरे; पण एवढी मोठी ढाल घरात घेऊन येण्यासाठी त्याला वेगळीच कसरत करावी लागली. 

अथणी (ता. बेळगाव) येथील काल आंतरराज्य पातळीवर हलगीवादनाची स्पर्धा झाली. कर्नाटक महाराष्ट्रातील 20 हलगीवादक त्यांच्या सहकाऱ्यांसह या स्पर्धेत सहभागी झाले होते. हालगी म्हणजे ठेका; पण हा ठेका संगीतातल्या विशिष्ट तालावरच आत्मसात करता येतो आणि ज्याला हे ताल आत्मसात त्याच्या बोटाच्या इशाऱ्यावर हलगीचा सूर घुमू लागतो. 

भार्गव आवळे हा महाराष्ट्र हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकतो. त्याचे वडील संजय आवळे यांच्यासमवेत तो वेगवेगळ्या समारंभात ताल धरत असतो. त्यातूनच तो हलगी शिकला व काल या स्पर्धेत सहभागी झाला. त्याने तेथे मिळालेली 20 मिनिटांची संधी घेत एक ताल, झपताल, त्रिताल व रूपक वाजवून अख्ख्या उपस्थितांना डोलवले. त्याला अमित आवळे, भावेश आवळे यांनी घुमके, झांजाची साथ दिली. 

या स्पर्धेत त्याचा पहिला क्रमांक आला; पण बक्षीस मिळालेली ढाल पाहून तो अचंबित झाला. चार फूट उंचीच्या भार्गवला पाच फूट उंचीची ढाल उचलणेही अवघड झाले. त्याने ही मानाची ढाल वेगळ्या गाडीतून घराकडे आणली. आज भार्गवचे शहरातील विविध थरांतील लोकांनी अभिनंदन केले. 

Web Title: bhargav awale