भीमा कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

कोल्हापूर - हजार जनावरे, बचत गटांचे सुमारे 300 स्टॉल, देश-विदेशांतील नामांकित कंपन्यांचा सहभाग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर अशा भरगच्च कार्यक्रमांसह पश्‍चिम महाराष्ट्रातील लक्षवेधी भीमा कृषी प्रदर्शनास शुक्रवारी (ता. 27) प्रारंभ होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या दहाव्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता होईल. मेरी वेदर ग्राउंडवर प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांना झुणका-भाकरही मोफत देण्यात येईल. प्रदर्शनात सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 बचत गटांनाही मोफत स्टॉल देण्यात आले आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य कृषी प्रदर्शन म्हणून गणल्या जाणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनात जनावरांचे व्यवस्थापन, जमिनीचे संगोपन केलेल्या पाच महिलांना साडी-चोळी, फेटा बांधून जिजामाता भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पाच शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, तर दहा शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार दिला जाईल, असेही खासदार महाडिक यांनी जाहीर केले. उत्कृष्ट कृषी संशोधक तंत्रज्ञ असणाऱ्या तीन व्यक्तींचा सन्मान केला जाईल. आदर्श कृषी विस्तारक पुरस्कारही पाच व्यक्तींना दिला जाईल.

Web Title: Bhima Agriculture Expo