"कुमुदा'चा अध्यक्ष भोसलेला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

कऱ्हाड - बनावट कागदपत्रे तयार करून साखर आयुक्त, रयत सहकारी साखर कारखान्याची फसवणूक केली. 85 लाखांची स्टॅम्पड्युटी चुकवून शासनालाही गंडवल्याप्रकरणी कुमुदा शुगर ऍण्ड ऍग्रो प्रॉडक्‍टचा कार्यकारी संचालक व अध्यक्ष अविनाश बसवंत भोसले (रा. सदाशिवनगर, बेळगाव) याला पोलिसांनी आज अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. बार्शी पोलिसांच्या ताब्यातून इकडे त्याला वर्ग केले आहे. 

कुमुदाने रयत कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला होता. त्याबाबतचा करार 2013 मध्ये साखर आयुक्तांसमोर झाला होता. त्या कराराची नोंदणी येथे करणे गरजेचे होते. मात्र, त्याने ती येथे न करता बनावट कागदपत्रे तयार करून बेळगाव येथे केली. त्यामुळे येथील स्टॅम्पड्युटी बुडवली. त्याशिवाय रयत कारखाना व साखर आयुक्तांसह शासनाचीही फसवणूक केली. त्याची फिर्याद कारखान्यातर्फे सुरेश थोरात यांनी फौजदारी न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार पोलिस तपासाचे आदेश होते. दीड वर्षानंतर आज भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी सांगितले, की या कराराचे येथील उपनिबंधकांकडे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक होते. मात्र, बनावट कागदपत्रे तयार करून बेळगावला तो करार रजिस्टर केला. रयत कारखान्याने त्याची तक्रार येथील फौजदारी न्यायालयात 2015 मध्ये दाखल केली होती. फौजदारी न्यायालयाने दोन सप्टेंबर 2015 रोजी पोलिस तपासाचे आदेश दिले होते. गेल्या दीड वर्षापासून तालुका पोलिसांचा तपास सुरू होता. स्टॅम्पड्युटी चुकविण्यासाठी भोसले याने शक्कल लढवून खोटी कागदपत्रे तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. ती स्टॅम्पड्युटी जवळपास 85 लाखांच्या आसपास होती. भोसले याला बार्शी पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. तेथून त्याला काल रात्री येथे आणण्यात आले. 

Web Title: bhosale arrested