400 वर्षाचे वडाचे झाड विधानसभेत गाजले; राज्य सरकारनं आणला कायदा

चळवळ केवळ एक झाड वाचवण्याची ठरली नाही तर कायदा बदलणारी ठरली
400 वर्षाचे वडाचे झाड विधानसभेत गाजले; राज्य सरकारनं आणला कायदा

सांगली : रत्नागिरी ते नागपूर (ratnagiri - nagpur) या राष्ट्रीय महामार्गावर (national highway) येणारे भोसे (bhose) (ता. मिरज) येथील चारशे वर्षे जुने वडाचे झाड (banyan tree) विधानसभेत (assembly) गाजले. हे झाड वाचवण्यासाठी चळवळ उभी करावी लागली होती. (sangli district) ते झाड वाचलेच, शिवाय त्यामुळे राज्य शासनाला नवा कायदा (new law) करावा लागला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तो मांडला, मंजूर झाला आणि पर्यावरण प्रेमींनी त्याचे जोरदार स्वागत केले आहे. ती चळवळ केवळ एक झाड वाचवण्याची ठरली नाही तर कायदा बदलणारी ठरली.

आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) यांनी झाडांसाठी नागरी संरक्षण कायदा मांडताना सरसकट वृक्षतोडीला चाप लावला. एखाद्या रस्त्यासाठी किंवा विकास प्रकल्पासाठी जुने झाड तोडावेच लागणार असेल तर ते झाड जेवढे वर्ष जुने असेल तेवढीच नवी झाडे लावण्याची सक्ती केली जाईल. ही झाडे सहा ते सात फूट उंचीची असतील. जेणेकरून ती जगली पाहिजेत. ‘हेरीटेज ट्री’ जगलेच पाहिजेत, हा आग्रही मुद्दा त्यांनी मांडला.

400 वर्षाचे वडाचे झाड विधानसभेत गाजले; राज्य सरकारनं आणला कायदा
येत्या 48 तासांत मान्सून 'कमबॅक'; मुसळधार पावसाची शक्यता

निसर्गप्रेमींसाठी आनंदाची घोषणा करताना त्यांनी वृक्ष समितीचे महत्त्व वाढवले. जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या बहुतांश समितीच्या या केवळ राजकीय काम करतात. त्या झाडे तोडायला सहज मान्यता देतात. आता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘महाराष्ट्र ट्री ॲथोरिटी’ स्थापन होईल. त्यात निसर्गासंबंधीचे तज्ज्ञ नेमले जातील. एखाद्या शहरात दोनशेहून अधिक झाडे कापायची असतील किंवा हेरिटेज झाडे कापायची असतील तर तो प्रस्ताव या समितीकडे येईल, असा कायदा करण्यात आला. हे एका झाडासाठीच्या आंदोलनामुळे घडले. त्या चळवळीने कायदा करायला लावला.

"महाराष्ट्राच्या निसर्ग हितासाठी हा चांगला निर्णय आहे. कोणतीच यंत्रणा वृक्ष समितीला विचारातच घेत नव्हती. एखादा विकास प्रकल्प होताना प्रशासन आणि ठेकेदारांत साटेलोट करून निसर्ग संवर्धनाला दुय्यम दर्जा दिला जात होता. हे आता थांबेल, अशी अपेक्षा आहे. प्राणी, पक्षिमित्रांना याचा फार आनंद आहे."

- प्रदीप सुतार, निसर्गप्रेमी आंदोलक

400 वर्षाचे वडाचे झाड विधानसभेत गाजले; राज्य सरकारनं आणला कायदा
‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

"वडाचे झाड टिकले याचा आम्हाला खूप आनंद आहे. कारण, हे चारशे वर्षे जुने झाड होते. त्या अनुषंगाने झालेल्या निर्णयाचेही आम्ही स्वागत करतो. आता झाड वाचवताना काही वस्त्यांबाबत रस्त्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, हा प्रश्‍न राज्य शासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून सोडवू."

- विकास चौगुले, सरपंच, भोसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com