भुतकर हत्याकांडातील मुख्य आरोपी गजाआड

Crime
Crime
नगर - शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथील गणेश भुतकर हत्याकांडातील पसार असलेला मुख्य आरोपी अविनाश बानकर याच्यासह एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबई येथून आज पहाटे अटक केली. या गुन्ह्यात यापूर्वी पाच जणांना अटक केलेली आहे. अविनाश चांगदेव बानकर (वय 35, रा. बानकर वस्ती, शनिशिंगणापूर, ता. नेवासे), गणेश ऊर्फ रवींद्र बाळासाहेब सोनवणे (वय 28, रा. घोडेगाव, ता. नेवासे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शनिशिंगणापूर येथील गणेश भुतकर व अविनाश बानकर यांच्यामध्ये जागेवरून आपसांत वाद झाला. त्यावरून अविनाश बानकर याने साथीदारांच्या मदतीने हत्येचा कट रचून 21 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी गणेश भुतकरला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून तलवार, पिस्तूल, कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यात गणेश भुतकर जागीच ठार झाला. याबाबत मृत गणेश भुतकरचे भाऊ रामेश्‍वर भुतकर यांच्या फिर्यादीवरून शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com