दुचाकी चोरणारा गजाआड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पाथर्डी : पुण्यातील स्वारगेट व मार्केटयार्ड भागातील दुचाकी चोरणाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केले. भारत बटुळे (वय २३) रा. भारजवाडी ता. पाथर्डी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरी करुन विक्री करणाऱ्यांची टोळी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

स्वारगेट पोलिसांनी 17 मे 2018 रोजी मोटारसायकल चोरताना बटुळे याला पकडले होते. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो दुचाकी चोरतो व त्या खरवंडी परीसरात विकतो याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश मोरे, पोलिस उपनिरीक्षक समाधान कदम शुक्रवारी खरवंडी परीसरात दाखल झाले. खरवंडी गाव व परीसरातील नागरीकाकडुन सात दुचाकी ताब्यात घेतल्या. ज्यांच्याकडे दुचाकी सापडल्या त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या असून, आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. यातुन मोठी टोळी सापडण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

खरवंडी परीसरात चोरीच्या दुचाकीची संख्या मोठी आहे. याच भागातील आणखी काही जणांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यात पुणे पोलिसांनी वर्तविली आहे. सहा महीन्यापुर्वी पाथर्डी शहरातुन दहा बुलेट  खराडी पोलिसांनी जप्त करुन आगसखांड येथील एकाला अटक केली होती. आता ही दुसरी टोळी उजेडात आली आहे.   

Web Title: Bicycle thief arrested