बड्या अधिकाऱ्यांची चौकशी करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

कोल्हापूर - वारणेतील चोरी प्रकरणातील फिर्यादीकडे नऊ कोटींची रक्कम आली कोठून, यांसह स्थानिक अधिकाऱ्यांची, तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक यांची चौकशी करावी, अशी मागणी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली. शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय पवार 
यांनी केले.

कोल्हापूर - वारणेतील चोरी प्रकरणातील फिर्यादीकडे नऊ कोटींची रक्कम आली कोठून, यांसह स्थानिक अधिकाऱ्यांची, तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक यांची चौकशी करावी, अशी मागणी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली. शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय पवार 
यांनी केले.

गुलदस्त्यातील मुद्दे पुढे येण्यासाठी तपास ई.डी.कडे द्यावा, बड्या धेंडांना वाचविण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करेल, त्याचप्रमाणे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचीही याबाबत भेट घेणार असल्याचेह पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

निवेदनात म्हटले आहे, की आज अखेर सुमारे नऊ कोटी रकमेचा तपास लागला असून या चोरी प्रकरणातील प्रमुख फिर्यादी झुंजार सरनोबत यांची नेमकी किती रक्कम चोरीला गेली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. बांधकाम व्यावसायिक सरनोबत यांचेकडील रक्कम नेमकी किती याबाबत तपास अधिकारीही ठामपणे सांगू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. फिर्यादीकडे एवढी रक्कम कोठून आली, याचा गुंता जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्णच होऊ शकत नाही. या गुन्ह्यातील या पूर्वीचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक व पोलिस अधीक्षक तसेच त्यांचे सहकारी तपासी अधिकारी यांचीही भूमिका या प्रकरणी संशयास्पद आहे.

यापूर्वी ज्या स्थानिक अधिकाऱ्यांनी चोरीचा तपास केला, त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, ज्या शैक्षणिक संकुलात ही रक्कम सापडली ती वास्तू नेमकी कोणाच्या मालकीची आहे, त्या व्यक्तीला या गुन्ह्यात जबाबदार धरून सर्वप्रथम त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या प्रकरणाचा तपास जलद गतीने होईलच, याचबरोबर या प्रकरणाचे मूळ शोधण्यासाठी व यातील खरा सूत्रधार गजाआड करण्यासाठी हा तपास ईडीकडे द्यावा.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, शिवाजीराव पाटील, दत्ताजी टिपुगडे, हर्षल सुर्वे, विराज पाटील, राजू यादव, संजय जाधव, राजेंद्र पाटील, राजू जाधव, कमलाकर जगदाळे, दिनेश परमार, अवधूत साळोखे, शुभांगी पोवार, रिया पाटील, दीपाली शिंदे, कमल पाटील, भीमराव पाटील, सुनील पोवार, राजू सांगावकर, जितेंद्र बागट, धनाजी बिरंजे, साताप्पा शिंगे, अजित आयरेकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

Web Title: big officer inquiry