चार मिनिटांत गायब होते बाईक ! 

परशुराम कोकणे
सोमवार, 19 डिसेंबर 2016

दीपक राजू राठोड (वय 22, रा. सुदर्शन कॉलनी, डांगे चौकीजवळ, वाकड रोड, पिंपरी चिंचवड, पुणे. मूळ- दोड्डी लमाण तांडा, ता. दक्षिण सोलापूर), शरणू प्रकाश वसुदोड्डी (वय 23, रा. रमणनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

सोलापूर - कामाच्या घाईत तुम्ही तुमची बाईक जागा मिळेल तिथे पार्किंग करून निघून जाता.. बरोबर ना..? तुम्ही गेल्यानंतर अवघ्या चार ते पाच मिनिटांतच बाईकचे हॅण्डल लॉक तोडून ती पळवून नेली जाऊ शकते..! अवघ्या काही मिनिटांत बाईक गायब करणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्या सोलापुरात कार्यरत आहेत.

विजापूर नाका पोलिसांनी गेल्या आठवड्यात दुचाकी वाहन चोरणाऱ्या दोघांना अटक करून तेरा वाहने जप्त केली आहेत. 

दीपक राजू राठोड (वय 22, रा. सुदर्शन कॉलनी, डांगे चौकीजवळ, वाकड रोड, पिंपरी चिंचवड, पुणे. मूळ- दोड्डी लमाण तांडा, ता. दक्षिण सोलापूर), शरणू प्रकाश वसुदोड्डी (वय 23, रा. रमणनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दीपक आणि शरणू हे गेल्या अनेक महिन्यांपासून दुचाकी वाहने चोरी करीत असून विजापूर नाका पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने अखेर त्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून जप्त केलेली सर्व 13 वाहने नवीन आहेत. दोन वाहनांना तर अद्याप क्रमांकही मिळालेला नाही.

चोरलेली दुचाकी वाहने अक्कलकोट रोड परिसरातील शरणू वसुदोड्डी याच्या जागेत ठेवली होती. त्यानंतर डुप्लिकेट नंबर प्लेट लावून ती स्वस्तात विकली जात होती.

Web Title: bike thief in solapur