बळीराजा शेतकरी संघटना 'या' जागा लढवणार

बळीराजा शेतकरी संघटना 'या' जागा लढवणार

इस्लामपूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने बी. जी. पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील टाळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली. याबरोबरच सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद या सहा लोकसभेच्या जागांवर बळीराजा शेतकरी संघटना निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. पाटील म्हणाले, "केवळ शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आमचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत काँग्रेसचे सरकार नालायक होते म्हणून लोकांनी भाजपचे सरकार निवडून दिले. मात्र ते काँग्रेसच्या पुढे एक पाऊल महानालायक निघाले. त्यांना शेतकरी व सर्वसामान्य लोकांशी काही देणेघेणे नाही. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरीही शेतकरी गुलामगिरीतच जगत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले नाही.

स्वातंत्र्य मिळाले त्यावेळीही शेतकरी कर्ज काढून शेती करत होता आणि आजही कर्ज काढूनच शेती करतो आहे. रात्रंदिवस घाम गाळून पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतमाल खरेदी करणाऱ्या ग्राहकाला परवडत नाही. या खरेदी विक्रीत फक्त दलालच मालामाल झाले आहेत. शेतकरी मात्र कर्जात बुडालेला आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनाला ताकद मिळावी व त्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून बळीराजा शेतकरी संघटना निवडणूक लढवत आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

साताऱ्यातून मी स्वतः, हातकणंगलेमधून बी जी पाटील, माढा मधून संजय पाटील - घाटणेकर, सांगलीमधून डॉ. उन्मेष देशमुख, कोल्हापूरमधून नितीन पाटील, उस्मानाबाद मधून भीमाशंकर बिराजदार निवडणूक लढवणार आहेत.

- पंजाबराव पाटील

बळीराजा बरोबरच मराठा क्रांती सेनेचे सुरेश पाटील, नागपूरची जय जवान जय किसान संघटना, स्वाभिमानीमधून फुटलेला शिवाजी माने गट, शिरोळमधून अंकुश आंदोलन तसेच समविचारी एकत्र येऊन लढत देणार आहोत, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

पत्रकार बैठकीला अमोल चव्हाण, अशोक सलगर, सुधीर कदम, साजिद मुल्ला, उत्तम ख बा ले, सुनील कोळी, चंद्रकांत खामकर, मनोज पवार, धनाजी जाधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com