कऱ्हाडला पक्षीमित्र संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात 

karhad
karhad

कऱ्हाड ः येथे होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय तर 32 व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. संयोजकांनी सोशल मिडीयावर याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे येथील वातावरणही पक्षीमित्रमय झाले आहे. देश, राज्यातील अनेक पक्षी अभ्यासकांची संमेलनास उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे पक्षमित्र संमेलनातून राज्य व देशातील पक्षांच्या अभ्यासाशिवाय त्यांच्यावरील संशोधनाच्याही अनेक वेगळ्या गोष्टी समोर येणार आहेत. अशी शक्यता पक्षी तज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

पक्षीमित्र संमेलनानिमित येथे जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी फेसबुक, ट्युटर, वॉटस अप सोशल मिडायाचा त्यांनी वापर केला आहेच. त्याशिवाय निबंध, छायाचित्रण व लघुपटांच्या स्पर्धाही घेतल्या आहेत. त्यामुळे दोन दिवस पक्षी मित्रांसाठी मेजवानीच असणार आहे. चित्रकला, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा होत आहेत. त्यात अनेकांनी सहभागही घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धेत देशभरातून अनेक स्पर्धक जाले आहेत. संमेलनात पारितोषिक देण्यात येणार आहेत. सहभागी होणाऱ्यांना पक्षांवरील पुस्तकासह एक संच भेट देण्यात येमारआहे. येणाऱ्या पक्षी मित्रांसाठी पुस्ताकांचे स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. सेमलनाचे औचित्य साधून वर्धा ते कऱ्हाड असी पक्षी जतन व संवर्धन जागृती सायकल रॅली काढण्यात आली आहे. ती रॅली २३ नोव्हेंबरला येथे पोचणार आहे.

सकाळी आठला कोल्हापुर नाक्यावर आल्यानंतर तेथे स्वागत होवून त्यामध्ये स्थानिक सायकलपट्टू सहभागी होणार आहेत. वातावरण निर्मितीसाठी ती र्रली शहरात काढली फिरवण्यात येणार आहे. संयोजक असलेल्या कऱ्हाड जिमखान्यातर्फे पक्षमित्र संमेलनाचे आयोजन होत असले तरी संमलनात शासकीय वन विभाग, राज्य जैवविविधता मंडळ, निसर्ग पर्यटन विकास मंडळ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, बाम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, कांदळवन प्रतिष्ठान आदी शासकीय संस्था प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात होणाऱ्या संमेलनाची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. त्या माध्यमातून शासनाच्या पुढाकारतून येथे पक्षी अध्ययन केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचेही स्वागत होत आहे. शुक्रवारी नोव्हेंबरला सकाळी दहाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन आहे. 

असे आहेत, कार्यक्रम 
23 नोव्हेंबर ः सकाळच्या सत्रात - डॉ. सतीश पांडे यांचे समुद्री, किनारपट्टीचे आणि कांदळवनातील पक्षीजीवनावर व्याख्यान 
23 नोव्हेंबर ः दुपारी- नागपूर येथील डॉ. अनिल पिंपळे यांचे आदिवासी जमातींकडील पक्षीविषयक ज्ञान व माहिती. 
23 नोव्हेंबर ः अमरावतीचे किरण मोरे यांचे दुर्लक्षित गवताळ माळरानावरील चंडोल प्रजातींचा अभ्यासाची माहिती 
23 नोव्हेंबर ः अमरावती येथील सौरभ जौंजाळ यांचे आखुड कानाचे घुबड स्थलांतर काथळातील खाद्याचा अभ्यास व 
23 नोव्हेंबर ः भाग्यश्री परीब व प्रविण सावंत यांच सिंधुदूर्गचे पक्षी वैभव यावर मार्गदर्शन 
23 नोव्हेंबर ः सावंतवाडी येथील सुभाष पुराणिक यांचे निसर्ग, पक्षी संरक्षणासाठी समाजिक प्रतिसाद
23 नोव्हेंबर ः  मुंबई येथील डॉ. गिरीश जठार यांचे भारतातील संकटग्रस्त पक्षी संवर्धन - एक आव्हान. 
23 नोव्हेंबर ः नंदकिशोर दुधे यांचे लोहसहभागातून सामान्य पक्षी गणना 
23 नोव्हेंबर ः तुहीना कट्टी यांचे स्थलांतरीत पक्षी आणि त्यांचे प्रवासी मार्ग ठरवण्यात 

24 नोव्हेंबरचे कार्यक्रम
24 नोव्हेंबर ः सकाळ दहा वाजता - प्रशांत महाजन यांचे हवामान बदलाचा पक्षी जीवनावर होणारा प्रभाव
24 नोव्हेंबर ः रजत भार्गव यांचे पक्ष्यांचे अवैद्य व्यापार, पक्षी संवर्धनासाठी एक धोका, 
24 नोव्हेंबर ः डॉ. राजु कसंबे यांचे मराठी साहित्यांतील पक्ष्यांवरील पुस्तकांची माहिती 
24 नोव्हेंबर ः सह्यद्री व्याघ्रच्या उपसंचालिका डॉ. विनीता व्यास, रोहन भाटे यांचे व्याख्यान 
24 नोव्हेंबर ः दुपारी गोवा येथील पंकज लाड पक्षी संवाद 
24 नोव्हेंबर ः पराग रांगणेकर यांचे स्थानिक सहभागातून पर्यटन ः गोव्यातील एक प्रयोग आणि त्यातून मिळालेले धडे याविषयावर व्याख्यान
24 नोव्हेंबर ः पुणे येथील वरद गिरी यांचे फ्रॉग माऊथचे निरीक्षण ते बेडकांचे संरक्षण - एक वेगळ्या वाटेवरचा प्रवास
24 नोव्हेंबर ः सातारा येथील डॉ. जितेंद्र कात्रे यांचे पक्षांचे छायाचित्रण यावर मार्गदर्शन होईल. 
24 नोव्हेंबर ः मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी व मुंबई येथील अनिश अंधेरीया यांची यावेळी प्रकट मुलाखत 

निसर्ग चक्रातील पक्षांचे महत्व भावी पिढीला माहीती व्हावी, त्यांचे जतन व संवर्धन व्हावे या उद्देशाने संमेलनात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक यांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. संमेलनाबाबत परिसरातील विद्यार्थी व पक्षीमित्रांमध्ये वातावरण निर्मिती होवुन त्यांचा उस्फूर्त सहभाग व्हावा, यासाठी संमेलनापूर्वी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com