esakal | बेळगावात भाजपच्या मंगला अंगडींचा ऐतिहासिक विजय; कॉंग्रेसच्या जारकीहोळींची अखेरच्या क्षणी हार

बोलून बातमी शोधा

बेळगावात भाजपच्या मंगला अंगडींचा ऐतिहासिक विजय; कॉंग्रेसच्या जारकीहोळींची अखेरच्या क्षणी हार
बेळगावात भाजपच्या मंगला अंगडींचा ऐतिहासिक विजय; कॉंग्रेसच्या जारकीहोळींची अखेरच्या क्षणी हार
sakal_logo
By
महेश काशिद

बेळगाव : भाजप उमेदवार मंगला अंगडी बेळगावच्या पहिल्या खासदार ठरल्या. प्रतिस्पर्धी कॉंग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा सुमारे तीन हजार मताधिक्यांनी पराभव करत अतितटीच्या लढतीत विजय मिळविला. यामुळे भाजपचा बालेकिल्ला शाबूत राहिला आहे. श्रीमती अंगडी यांना सुमारे ४ लाख ३५ हजारापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. तर जारकीहोळी यांनी ४ लाख ३२ हजारापेक्षा अधिक मते घेतली आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना सव्वा लाख मतदान झाले आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज (२) मतमोजणी झाली. त्यात केपीसीसी कार्याध्यक्ष आणि कॉंग्रेस उमेदवार जारकीहोळी यांना ४ लाख ३२ हजार मते पडली. भाजप उमेदवार मंगला अंगडी यांना ४ लाख ३५ हजार मते पडली. यामुळे सुमारे दीड हजार अधिक मते अंगडी यांनी विजय मिळविला आहे. तर जारकीहोळी यांचा निसटता पराभव झाला. मतमोजणी पोस्टल मतदानांनी झाली. यात अंगडी आघाडीवर होत्या. त्यानंतर मतदान यंत्रातील मते मोजण्यास सुरु झाले. त्यात १० ते १४ हजार मतांची आघाडी घेतली.

हेही वाचा: 'अजित पवारांना शोधा...! घरात शिरून बीजेपीने तुम्हाला ठोकलय'

३२ व्या फेरीपर्यंत त्या आघाडीवर होत्या. परंतु, त्यानंतर जारकीहोळी यांचे मताधिक्य वाढले. सुरवात त्यांनी साडे चार हजार मताधिक्यांची आघाडी घेतली. पण, त्यानंतर सुमारे दहा ते बारा हजाराचे मताधिक्य कायम ठेवले होते. पण, यानंतर जारकीहोळी यांच्या मताधिक्यात घट झाली. अखेरच्या क्षणाला अंगडी यांचे मताधिक्य वाढले. श्‍वास रोखून धरायला लावणाऱ्या या निकालामध्ये अखेरपर्यंत आघाडी कायम राहिली. परत एकदा मतदार संघात कमळ फुलविले. श्‍वास रोखून धरायला लावणाऱ्या अटीतटीच्या लढतीत कधी पारडे हे भाजपचे जड वाटायचे तर कधी कॉंग्रेस उमेदवार जारकीहोळी यांचे. पण, अखेरला मंगला यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे.

शुभम शेळके यांनी दिली कडवीझुंज

राष्ट्रीय पक्षांच्या चुरशीच्या लढतीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी कडवीझुंज दिली. १ लाख २२ हजार ६४२ मते घेऊन इतिहास रचला आहे. शिवाय शेळके यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत चुरस तयार झाली होती.

हेही वाचा: परीक्षेला सुट्टी, शाळेला बुट्टी; मुलांची मानसिकता बिघडतेय