प्रभाग 16 ची पोटनिवडणूक लढवण्याचा भाजपचा निर्धार

BJP decides to contest Ward 16 by-election
BJP decides to contest Ward 16 by-election

सांगली  : महापालिकेची सत्ता गेल्यानंतर भाजपने आता प्रभाग क्रमांक 16 अ मधील पोट निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न होता. मात्र महापालिकेतील सत्ता गेल्याचे उट्‌टे काढण्यासाठी ही निवडणूक ताकदीने लढवण्याचे भाजपने ठरवले आहे. यासाठी सक्षम उमेदवार शोधण्याचे काम सुरु आहे. 

शहरातील प्रभाग क्रमांक 16 अ मधून कॉंग्रेसचे माजी महापौर हारूण शिकलगार विजयी झाले होते. त्यांचे गतवर्षी निधन झाले या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रारूप मतदार यांनी प्रसिध्द केली होती. त्यावर 23 फेब्रुवारीपर्यंत हरकत घेण्याची मुदत होती. मात्र एकही हरकत दाखल झाली नाही. त्यामुळे तीन मार्च रोजी अंतीम मतदार यादी जाहीर होणार आहे. 

राज्यातील काही महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकीसोबतच रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. यात सांगलीतील प्रभाग क्रमांक 16 अ चा समावेश आहे. कॉंग्रेसने या पोटनिवडणूकीसाठी शिकलगार यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देऊन ही जागा बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरु आहे. भाजपमधील एका गटानेही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची तयारी दर्शवली होती. 

दरम्यान, महापालिकेत भाजपचे सात नगरसेवक फोडून त्यांच्या सत्तेला सुरुंग लावून कॉंग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत आली. बहुमताने सत्ता मिळवूनही अवघ्या अडीच वर्षात सत्ता गमवावी लागल्याचे मोठे शल्य भाजपला आहे. त्यामुळे दुखावलेल्या भाजपने पोट निवडणूक लढवून कॉंग्रेसला पराभूत करून उट्टे काढण्याची तयारी चालवली आहे. या प्रभागातून चार पैकी दोन कॉंग्रेस तर दोन भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे येथे दोघांची ताकद समान आहे. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादीने महापालिकेतील आमची सत्ता गैरमार्गाने काढून घेतली. जनतेने आम्हाला कौल दिलेला असताना घोडेबाजार करून आमचे काही नगरसेवक विकत घेतले आणि जनमताचा अनादर केला. प्रभाग क्रमांक 16 मधील पोटनिवडणूक भाजप ताकदीने लढणार. यासाठी सक्षम उमेदवारांचा शोध सुरु झाला आहे. 
- दिपक शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप


संपादन : प्रफुल्ल सुतार 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com