भाजपमध्ये बदनामांची खोगीरभरती नाही - गाडगीळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

सांगली - बदनाम लोकांची भाजपमध्ये खोगीरभरती होणार नाही अशी स्पष्टोक्ती आज आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. मिरज पॅटर्नमधील शिलेदारांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला थेट उत्तर न देता श्री. गाडगीळ यांनी पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा याचा निर्णय व्यक्तिगत पातळीवर होत नसतो तर त्यासाठी पक्षाची कोअर समिती  संयुक्तपणे निर्णय घेते. पक्षनिकषानुसारच इच्छुकांना प्रवेश दिला जाईल. त्यात भ्रष्ट, बदनामांना थारा नसेल असे असे त्यांनी सांगितले. 

यावेळी माजी आमदार  दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे, मुन्ना कुरणे, प्रकाश ढंग, शरद नलवडे आदी उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकांची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यात भाजप आघाडीवर आहे. अनेकांनी त्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. ही प्रक्रिया दुतर्फा आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादीतील अनेक इच्छुक पक्षात येण्यास इच्छुक  आहेत, असे राष्ट्रवादीतून येऊन भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष झालेल्या पृथ्वीराज देशमुख यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्यांचा रोख मिरज पॅटर्नच्या शिलेदारांकडे  होता. या पार्श्‍वभूमीवर आज गाडगीळ यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत या दिशेनेच प्रश्‍नांची सरबत्ती झाली. 
आमदार गाडगीळ म्हणाले,‘‘पक्षात नव्या विचारांचे चांगले, सुशिक्षित लोक काम करू इच्छितात. त्याबरोबरच प्रस्थापित पक्षातीलही काही लोक आहेत.  मात्र भाजपमध्ये प्रवेश देण्यासंबंधी काही निकष आम्ही ठरवले आहेत. त्यानुसारच पक्षप्रवेशाची चर्चा होईल. आधी सांगली महानगर जिल्हा कोअर समितीत चर्चा होईल. अगदी माझ्यासह कोणी एकच व्यक्ती असा  निर्णय करू शकत नाही.’’

प्रवेशासंबंधी ‘इलेक्‍टीव्ह मेरिट’चा निकष आहे का ? या प्रश्‍नावर ते म्हणाले,‘‘तोच एकमेव निकष नाही. भाजपचा एकमेव निकष असेल. अगदी वरून काही आदेश आला तरी त्याचा पुनर्विचार कोअर समिती करेल.’’

खासदारांचाही रस्ते  हस्तांतरणास विरोधच
दारू दुकानांसाठी रस्ते हस्तांतरणाला आमचा विरोधच राहील, अशी भूमिका गाडगीळ यांनी जाहीर केली. खासदार संजय पाटील यांनी या निर्णयास वैयक्तिक विरोध राहील, अशी मोघम भूमिका घेतली होती. त्यापार्श्‍वभूमीवर गाडगीळ यांनी आज  प्रथमच स्पष्ट भूमिका मांडली. महासभेतही आमचे नगरसेवक असा ठराव झाल्यास विरोध करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदारांचे समर्थक रस्ते हस्तांतरणासाठी आर्थिक
आमिष दाखवत असल्याच्या गौतम पवार यांच्या आरोपाकडे लक्ष वेधले असता श्री. गाडगीळ म्हणाले, ‘‘खासदारांनी हस्तांतरणास यापूर्वीच विरोध केला आहे. त्यांच्यावरील आरोपाबाबत आधी शहानिशा करू.’’

Web Title: BJP does not sack bad reputation - Gadgil