भाजपची पहिली यादी 4 जुलैला : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

महापालिकेचा राज्य सरकारकडून कशाप्रकारे मदत करून विकास होईल. तसेच महापालिकेत काय करणार? या दोन मुद्यांवर पक्षाचा वचननामा करून निवडणूक लढवली जाईल. मुलाखतीनंतरच उमेदवारी निश्‍चित होईल.

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या मुलाखती 1 आणि 2 जुलै रोजी होतील. 4 जुलै रोजी पहिली उमेदवार यादी जाहीर केली केली जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादीतून पक्षात येणाऱ्यांना मुलाखतीतूनच जावे लागेल. ऐनवेळी कोणी आले तर लवचिकता दाखवली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आमराईतील ऑफिसर्स क्‍लबमध्ये आज झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, "निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज प्रमुख कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. तीनशेहून अधिक इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत. मुलाखती 1 आणि 2 जुलै रोजी घेतल्या जातील. भाजप लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मुलाखतीत निवडणूक लढवत आहात? यासह इतर प्रश्‍न विचारले जातील. 4 जुलै रोजी पहिली उमेदवार यादी जाहीर केली जाईल आणि अर्ज भरले जातील.

ते म्हणाले, "महापालिकेचा राज्य सरकारकडून कशाप्रकारे मदत करून विकास होईल. तसेच महापालिकेत काय करणार? या दोन मुद्यांवर पक्षाचा वचननामा करून निवडणूक लढवली जाईल. मुलाखतीनंतरच उमेदवारी निश्‍चित होईल. 1 आणि 2 तारखेच्या मुलाखतीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीतून आलेल्यांना देखील मुलाखत द्यावी लागेल. ऐनवेळी कोणी पक्षात आले तर लवचिकता दाखवली जाईल. कोणी उमेदवारी निश्‍चित झाल्याचा प्रचार करत असले तरी पक्षच अंतिम निर्णय घेईल. युतीबाबत शिवसेना, रिपाई आणि समविचारी पक्षांशी चर्चा केली जाईल.''

खासदार संजय पाटील अनुपस्थित 

कोअर कमिटीच्या आजच्या बैठकीत आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदी उपस्थित होती. परंतु खासदार संजय पाटील यांची अनुपस्थिती खटकली. याबाबत विचारल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी काही कारणास्तव ते आले नसल्याचे सांगितले.

सांगली, मिरजेत मुलाखती 

1 जुलै रोजी सांगलीत कच्छी जैन भवनमध्ये दहा प्रभागातील मुलाखती सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत होतील. तर दोन जुलै रोजी मिरजेतील पटवर्धन हॉलमध्ये मुलाखती होतील.

Web Title: BJP first list on July 4 says Chandrakant Patil