माजी आमदार बिजली मल्ल संभाजी पवार यांचे निधन

bjp Former MLA Sambhaji Pawar passed away
bjp Former MLA Sambhaji Pawar passed away

सांगली : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांचे  आज पहाटे सांगली येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.  राजकीय आखाड्यात विरोधकांचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असलेले संभाजी पवार हे कुस्तीच्या आखाड्यात बिजली मल्ल म्हणून ओळखले जात होते.
 दुपारी बारा वाजता सांगलीतून त्यांची अंत्ययात्रा सुरू होईल आणि एक वाजता मारुती चौकात अंत्यदर्शन  करता येईल त्यानंतर सांगलीतील  कृष्णाकाठी अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
 

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्यानंतर  सांगली विधानसभा  मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली त्यात वसंत दादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील  यांचा धक्कादायक पराभव करत  संभाजी पवार यांनी राजकारणात दमदार एन्ट्री केली.  एकूण पाच वेळा ते आमदार राहिले. आधी जनता दल आणि नंतर भारतीय जनता पक्षातून त्यांनी विरोधी आवाज म्हणून महाराष्ट्रभर दबदबा निर्माण केला. 2009 साली त्यांनी शेवटची विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यात दिवंगत मदन पाटील यांचा पराभव करत  विधानसभेत प्रवेश केला होता.


 भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी संभाजी पवार यांचा स्नेह बंद होता. संभाजी पवार यांनी राजकीय आखाड्यात जवढी चमक दाखवली तेवढी चमकत यांनी कुस्तीच्या आखाड्यात ही दाखवली. त्यांच्या अनेक कुस्त्या लक्षवेधी ठरल्या.  सांगलीच्या गाव भागातील पवार तालीममध्ये त्यांनी शेकडो मल्ल घडविले. 

गेल्या दोन वर्षापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाचीही बाधा झाली होती त्यावर यशस्वी मात करून ते घरी परतले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सर्वादय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार आणि माजी नगरसेवक गौतम पवार हे दोन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com