आरक्षणाचा प्रश्‍न भाजप सरकारच सोडवेल - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

जयसिंगपूर - मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न भाजप सरकारच सोडवेल. प्रत्येक समाजाला न्याय देण्याची पक्षाची भूमिका आहे. कार्यकर्ता हा माझा देव आहे. कोणत्याही कार्यकर्त्याची पक्षातून हकालपट्टी केली जाणार नाही. अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणार असून शहरी आणि ग्रामीण भागातील प्रश्‍न सोडवून लोकांच्या विश्‍वासास पात्र राहू, अशी ग्वाही, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

शहरातील सिद्धेश्‍वर हॉलमध्ये झालेल्या रयत क्रांती युवा संघटनेचा  मेळावा झाला. या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘‘आज लोकांना चार सुखाचे घास मिळावेत यासाठी आमचे कार्य सुरू आहे. सामाजिक प्रश्‍नांची जाणीव ठेवून नियोजनपूर्वक काम भाजपकडून सुरू आहे. ३१ ऑगस्टपासून गावागावात आयुष्यमान महाआरोग्य अभियान राबविले जाणार आहे. यातून शंभर टक्के शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. आरोग्य सेवक म्हणून प्रत्येकाच्या दारात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करून झोपडपट्टीतील नागरिकांचेही प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे. समाजावर अन्याय होईल, त्यावेळी ताकदीने रस्त्यावर उतरण्याची तयारी कार्यकर्त्यांची असली पाहिजे. भविष्यात सामाजिक प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.’’

अनिलराव यादव, राजवर्धन नाईक-निंबाळकर, सागर खोत यांची भाषणे झाली. नगराध्यक्षा डॉ. सौ. नीता माने, जिल्हा परिषद सदस्य, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, सुरेश सासणे उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना शाबासकी
मंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांतीच्या माध्यमातून आरोग्य सेवेतून अनेक गोरगरीब रुग्णांना आधार देण्याचे कार्य करणाऱ्या तसेच पक्षाला बळकटी देणाऱ्या कार्यकर्त्यांना शाबासकी दिली. पक्षाचा शहरातील पहिलाच मेळावा कार्यकर्त्यांच्या गर्दीत पार पडला.

Web Title: BJP government will solve the reservation question Sadabhau Khot