नगरपालिकेतील यशाने भाजपही स्पर्धेत

विष्णू मोहिते
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

काँग्रेस, राष्ट्रवादीला स्वबळाची खुमखुमी - विधानपरिषद, नगरपंचायती कोणाला तारक, कोणाला मारक?  

सांगली - स्थानिक स्वराज्य संस्थांत राष्ट्रवादी, काँग्रेसची हुकमत होती. गेल्यावेळी चौथ्या क्रमांकावर असलेला भाजप नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक निकालातील जनमतात पहिल्या क्रमांकापर्यंत आला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत स्वबळाची खुमखुमी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकमेकांची जिरवण्याच्या प्रयत्नात भाजपला कधी सत्ता स्पर्धेत आणले हे निवडणूक निकालानंतरच कळेल. भाजपच्या लाटेची लहर अजून कायम असल्याचे विधानपरिषद, नगरपालिका, नगरपंचायतीत स्पष्ट झाले आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादीला स्वबळाची खुमखुमी - विधानपरिषद, नगरपंचायती कोणाला तारक, कोणाला मारक?  

सांगली - स्थानिक स्वराज्य संस्थांत राष्ट्रवादी, काँग्रेसची हुकमत होती. गेल्यावेळी चौथ्या क्रमांकावर असलेला भाजप नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक निकालातील जनमतात पहिल्या क्रमांकापर्यंत आला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत स्वबळाची खुमखुमी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकमेकांची जिरवण्याच्या प्रयत्नात भाजपला कधी सत्ता स्पर्धेत आणले हे निवडणूक निकालानंतरच कळेल. भाजपच्या लाटेची लहर अजून कायम असल्याचे विधानपरिषद, नगरपालिका, नगरपंचायतीत स्पष्ट झाले आहे. 

अर्थात संभाव्य धोका 
लक्षात घेऊन स्थानिक आघाड्यांची चलती राहण्याची शक्‍यता वाढली आहे. प्रत्येक तालुक्‍यांत वेगवेगळी समीकरणे अस्तित्वात येऊ शकतात. यामुळे नेत्यांच्या छुप्या आघाडींची 

शक्‍यता कमी झाली आहे. सर्वच 
पक्षांनी फड जिंकून देणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू ठेवला आहे.  जिल्ह्यात भाजपला तासगाव नगरपालिका वगळता फारसे काही हाती लागले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणूक काळात राष्ट्रवादीतून आलेल्या फौजेला 
पालिका निवडणुकीत चाणाक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाला लावले. 

अर्थात हे काम करून घेण्याचे वर्तुळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच अधिक फोकस राहिले. मंत्रिपद, महामंडळ अध्यक्षपदाचे गाजर दाखवून फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या झेडपी, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पुन्हा तोच (दारू तीच, लेबल वेगळे) प्रयोग केला जाईल. विधानपरिषदेनंतर झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निकालावरील चर्चेतून जिल्ह्यातील ‘जेजेपी’ चे नामोनिशाण मिटले. अशीच स्थिती राहिल्यास झेडपी, पंचायत समितीच्या निवडणूक स्पर्धेत भाजपही असेल, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. 

भाजपचे नेते दिवंगत प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने राज्यात भाजप-सेना युती साकारली. शिवसेनेच्या बोटाला धरून राज्यात पाय ठेवलेल्यांनी आता राज्य काबीज केले आहे. त्यावेळी महाजनांच्या शिवसेनेची ताकद लक्षात आली. मात्र केंद्र, राज्यातील आघाडीचे सरकार गेल्यानंतरही दोन-तीन वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादीला तेवढे शहाणपण सुचले नाही. आगामी काळात त्यांची स्वबळाची खुमखुमी कायम राहिल्यास मतविभागणीचा मोठा धोका आहे. जिल्ह्यात त्यांचा थेट फायदा भाजपला होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी बंधू मोहनराव कदम यांना आमदार करताना दाखवलेले चातुर्य अन्य निवडणुकांतही दाखवावे, असे मत त्यांच्याच पक्षातील काहींनी रोखठोक बोलूनही दाखवले. नगरपालिकांच्या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेस प्रथम क्रमांकावर राहिली. मात्र त्यासाठी काँग्रेस नेत्यांकडून काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. तासगाव नगरपालिकेत स्वतंत्र लढणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद दिलीच नाही. वाळवा, आष्टा, खानापुरात आघाड्यांसाठीही मूक संमती दिली नाही. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनाही फायद्याशिवाय पक्षाचे देणे-घेणे नाही, अशी चर्चा सुरू आहे.  

राष्ट्रवादी पुरती घायाळ
विधानपरिषद, नगरपालिकांतील अपयशाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुरते 
घायाळ झालेत. तेच चित्र झेडपी, पंचायत समित्यांत राहण्याची भीती त्यांना आहे. तरीही कोणत्याही ठिकाणी तडजोडीची शक्‍यता नाही. राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, सुमन पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

तालुकानिहाय लढती...

  • आटपाडी- राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपात लढत 
  • जत- भाजप, काँग्रेस, जनसुराज्य, राष्ट्रवादीत लढत
  • कवठेमहांकाळ- राष्ट्रवादी- अजितराव घोरपडे गट, काँग्रेस, भाजपात लढत
  • मिरज- काँग्रेस भक्कम, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानीत लढत
  • शिराळा - भाजप विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे लढणार
  • वाळवा- राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय आघाडी (काँग्रेस, भाजप, स्वाभिमानी, विकास आघाडी)
  • खानापूर, कडेगाव, पलूस- काँग्रेसचे वर्चस्व, भाजप, राष्ट्रवादीत लढत
  • तासगाव- राष्ट्रवादी- भाजपात अटीतटी, काँग्रेसही रिंगणात  

ताकद दाखवा...पदे मिळवा
सत्ताधारी भाजपचे चार आमदार, दीड खासदार जिल्ह्यात आहेत. त्यांना या निवडणुकीत ताकद दाखवा, मंत्रिपदांसह महामंडळ स्पर्धेत उतरवले जाणार आहे. खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप स्पर्धेत असतील. केवळ विधानसभा जिंकण्याचाच कायम विचार करणारे आमदार सुरेश खाडे यांच्याकडून याकडे गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. आमदार सुधीर गाडगीळ यांचा तर केवळ दोन झेडपी मतदारसंघापुरताच संबंध आहे. 

Web Title: bjp involve in municipal success competition