पंढरपूरचा आमदार भाजपचा असण्यासाठी प्रयत्न करावेत: देशमुख

हुकूम मुलाणी
सोमवार, 2 एप्रिल 2018

सर्वप्रथम माने व जगदाळे गल्लीतून कार्यकर्त्याच्या घरावर भाजपाचा झेंडा लावून अभियान नगरसेविका निर्मला विष्णुपंत माने यांचे हस्ते व नगरसेवक प्रशांत यादव यांचे हस्ते वार्डातून झेंडा व घरावर स्टीकर लावून सुरूवात केली. तर शनिवार पेठ येथील शिवाजी तालीम पासून भाजपचे शहर अध्यक्ष गौरीशंकर बुरकूल नगरसेवक अनिल बोदाडे , सतीश म्हेत्रे, यांचे हस्ते कार्यकर्ते यांच्या घरावर भाजपचे झेंडे व स्टीकर लावून बूथ चलो अभियान राबविण्यात आले. शनिवार पेठ येथील मारुती मंदिर येथे या अभियानाचा समारोप झाला.

मंगळवेढा : केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाने सर्वसमान्याच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे हा पक्ष पहिल्या क्रमांकावर आला आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा आमदारही भाजपाच्या कमळ चिन्हावर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

मंगळवेढ्यात भाजपा वतीने बूथ चलो अभियान राबविण्यात आले. त्यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार, उपाध्यक्ष शशीकांत चव्हाण अविनाश माहागावकर, दशरथ काळे, राजेंद्र सूरवसे, गौरीशंकर बुरकूल, प्रशांत यादव, अनिल बोदाडे, दत्तात्रय जमदाडे, शुभांगी सूर्यवंशी, दीपक माने, सतीश म्हेत्रे, पप्पू यादव, माऊली शिंदे, सैफन शेख, विश्वास चव्हाण, चंद्रकांत जाधव, सत्यजित सुरवसे, आबा लांडे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, दत्तात्रय यादव, सुरेश जोशी, सुनील रत्नपारखी, संतोष मोगले, मल्लिकार्जुन शिरोळे, बिरु घोगरे, साहेब उगाडे, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सहकारमंत्री देशमुख म्हणाले केंद्रात खासदार व महाराष्ट्रसह अन्य राज्यातही या पक्षाचे आमदार जास्त असून या पक्षाची सदस्य संख्याही सर्वाधिक आहे. सत्तेच्या माध्यमातून सर्वच घटकाच्या हिताचे निर्णय घेतले. हे निर्णय बुथ प्रमुखांनी घरोघरी जावून याची माहिती देवून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. शिवाय सहा एप्रिल रोजी भाजपा स्थापना दिवस असल्याने महा मेळावा मुंबई येथील बीकेसी मैदानावर होत असून यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे आवाहन सहकार मंत्री देशमुख यांनी केले.  

सर्वप्रथम माने व जगदाळे गल्लीतून कार्यकर्त्याच्या घरावर भाजपाचा झेंडा लावून अभियान नगरसेविका निर्मला विष्णुपंत माने यांचे हस्ते व नगरसेवक प्रशांत यादव यांचे हस्ते वार्डातून झेंडा व घरावर स्टीकर लावून सुरूवात केली. तर शनिवार पेठ येथील शिवाजी तालीम पासून भाजपचे शहर अध्यक्ष गौरीशंकर बुरकूल नगरसेवक अनिल बोदाडे , सतीश म्हेत्रे, यांचे हस्ते कार्यकर्ते यांच्या घरावर भाजपचे झेंडे व स्टीकर लावून बूथ चलो अभियान राबविण्यात आले. शनिवार पेठ येथील मारुती मंदिर येथे या अभियानाचा समारोप झाला.

Web Title: BJP leader Subhash Deshmukh in Pandharpur