कोल्हापूर: सत्ताधाऱ्यांचा धुव्वा, भाजपाची मुसंडी

bjp
bjp

कोल्हापूर : जिल्ह्यातील आठपैकी सात नगरपालिकांत सत्तांतर घडवून मतदारांनी प्रस्थापितांचा धुव्वा उडवला आहे. या सातही ठिकाणी भाजपा आघाडीने मुसंडी मारली. आपण म्हणेल तेच गावांत होईल या भ्रमात हवेत असलेल्या मुरगुडात पाटील बंधु, पन्हाळ्यात मोकाशी, पेठवडगांवमध्ये विद्याताई पोळ, गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीला तर जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावरर अशा मातब्बरांना मतदारांनी जमीनीवर आणले आहे. 

जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांसाठी काल चुरशीने 80 टक्के मतदान झाले होते. आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. पहिला निकाल पन्हाळा नगरपालिकेचा अवघ्या अर्ध्या तासात लागला. पन्हाळ्यात आसिफ मोकाशी नगराध्यक्ष होते, त्यांचा धुव्वा उडवत "जनसुराज्य' 13 जागा जिंकून सत्ता मिळवली. मलकापूरमध्येही "जनसुराज्य' ने सत्तांतर घडवत राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीचा पराभव केला. 

जिल्ह्यातील सर्वाधिक चुरशीने झालेल्या मुरगुड नगरपालिकेत सत्ताधारी पाटील बंधू-राष्ट्रवादी आघाडीचा सुफडासाप करून शिवसेनेने सत्ता मिळवली. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे राजेखान जमादार विजयी झाले. पेठवडगांवात विद्याताई पोळ यांचा धुव्वा उडवून युवक क्रांती आघाडीने झेंडा फडकवला. इचलकरंजी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. अलका स्वामी, कागलमध्ये भाजपाच्या उमेदवार सौ. निशा रेळेकर तर जयसिंगपूरमध्येही भाजपा आघाडीच्या सौ. निता माने आघाडीवर आहेत.

गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीची सत्ता उलथवून जनता दलाने सर्वाधिक  जागा जिंकत सत्ता मिळवली. जनता दलाच्या सौ. स्वाती कोरी नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. 
कुरूंदवाडमध्ये नगराध्यक्ष पदी कॉंग्रेसचे जयराम पाटील अवघ्या 110 मतांनी विजयी झाले. याठिकाणी कॉंग्रेसला सहा, भाजपाला सहा तर राष्ट्रवादीला पाच नगरसेवक पदाच्या जागा मिळाल्या. कॉंग्रेसचा नगराध्यक्ष झाल्याने दोन्ही कॉंग्रेस याठिकाणी सत्तेवर येण्याची शक्‍यता आहे. इचलकरंजी नगराध्यक्षपदी भाजापचा उमेदवार आघाडीवर असला तरी नगरसेवक कॉंग्रेसची वाढून आहेत, राष्ट्रवादी पिछाडीवर आहे. जयसिंगपूरमध्ये मात्र भाजपा-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आघाडी घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com