
सांगली : पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा सांगली येथे भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने बुधवारी सायंकाळी मेणबत्ती हातात घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच या दहशतवादी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध केला.