शिवरायांशी मोदींची तुलना म्हणजे शिवरायांचाच सन्मान ; भाजपच्या या नेत्याची मुक्ताफळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज अशी करणे चुकीचे नाही, या पुस्तकाच्या लेखकांचे मी समर्थन करतो अशी मुक्ताफळे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी कोल्हापुरात उधळली. 

कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज अशी करणे चुकीचे नाही, या पुस्तकाच्या लेखकांचे मी समर्थन करतो, अशी तुलना करणे गैर नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे, अशी मुक्ताफळे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी  कोल्हापुरात उधळली. 

भाजपच्या पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमातला प्रताप

भाजपच्या शहर व जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आयोजित कार्यक्रमात श्री. हाळवणकर बोलत होते. कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. 

पाहा - भाजपची ताकद महाडिक यांच्या पाठीशी

हाळवणकर म्हणाले, "साडेतीनशे वर्षानंतर शिवाजी महाराजांसारखी युध्दनिती, महाराजांसारखा जाणता राजा, सामान्य शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याची महाराजांची भुमिका होती, त्याच धर्तीवर एखादा शेतकरी अडचणीत आला तर मोदी यांनी शेतकरी सन्मान योजनेतून त्याला दरवर्षी सहा हजार रूपये त्याच्या खात्यावर टाकण्याची कल्पना आणली, ही कुणालाही सुचली नाही.  मोदी यांच्या माध्यमातून ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या नावांवर जमा होते. एखादा गरीब माणूस आजारी असेल तर आयुष्यमान भारत योजनेतून त्याचा पाच लाखांपर्यंतच वीमा उतरवण्यात आला आहे. त्यातून त्याला कोणत्याही दवाखान्यात उपचार करता येतील. ' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Compares Modi With Shivaji maharaj kolhapur marathi news